जळगांव दि.४ मे २०२४ : लोकसभा निवडणूक महायुतीच्या भाजपा उमेदवार स्मिता ताई वाघ यांच्या प्रचारार्थ जळगाव शहरातील गौतमनगर भागात प्रचार रॅली काढण्यात आली. या प्रचार रॅलीची सुरुवात या भागातील श्री इच्छादेवी जागृत देवस्थान मंदिरात दर्शन घेत करण्यात आली.
यावेळी परिसरातील नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला.
यावेळी शहराचे आमदार राजूमामा भोळे, विनोद देशमुख,अनिल अडकमोल,शिवसेना नगरसेवक दिलीप पोकळे, शिवसेना नगरसेवक प्रविण कोल्हे, शिवसेना नगरसेवक भगत बालानी, भाजपा नगरसेवक सुनिल खडके, माजी महापौर जितू मराठे, राजेंद्र घुगे पाटील, दिपक सूर्यवंशी, शोभा चौधरी, सुशील हसवानी यांसोबत महायुतीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थिती होते.