कृपाळू शिव-साई देवस्थान देविदास कॉलनी च्या जागे वर मल्लखांब ग्राऊंड चे उद्घाटन
परिसरातील १०ते १५ वयोगटातील मुला मुलींना विविध खेळाचे प्रशिक्षण देणार

जळगांव दि.१९ : येथील पंचमुखी हनुमान मागील लक्ष्मी नगर,देविदास कॉलनीतील कृपाळू शिव-साई देवस्थान च्या मोकळ्या जागे वर नुकतेच मल्लखांब ग्राउंड चे उद्घाटन करण्यात आले. आज च्या काळात लहान मुले खेळाच्या मैदानावर दिसत नाहीत तर ते सतत मोबाईल वर गेम खेळत असतात या मुलांना मोबाईल पासून दूर करून खेळायच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात यासाठी
कृपाळू शिव साई मंदिर संस्थान चे अध्यक्ष विवेक जगताप, पदाधिकारी व इतर सदस्य यांनी एक संकल्पना राबविण्याचा हेतूने निर्णय घेण्यात आला की आपल्या परिसरातील १०ते १५ वयोगटातील लहान मुले मुली यांना मल्ल खांब , कबड्डी, कुस्ती या खेळांचे प्रशिक्षण द्यावे , त्याचे मूर्त रूप आणण्यास परिसरातील मुकेश साळवे यांनी तलाठी मनोहर बाविस्कर याच्याशी संपर्क साधून संस्थान च्या जागेवर विनाशुल्क १० डंपर मुरूम टाकून दिला त्यामुळे या जागेला मैदानाचे मूर्त स्वरूप आले.
आज त्याचे मल्लखांब ग्राऊंड म्हणून
आमदार राजू मामा भोळे यांचे चिरंजीव विशाल भोळे, माजी नगरसेवक चेतन शिरसाळे, कुंदन काळे ,विठोबा चौधरी तलाठी मनोहर बाविस्कर याच्या शुभ हस्ते विधिवत पूजन व श्रीफळ वाढवून उद्घाटन करण्यातआले. यानंतर वरणगाव येथून आलेल्या काही शालेय विद्यार्थ्यांनी मल्ल खांब प्रात्यक्षिके आणि कसरती करून दाखविल्या.
याप्रसंगीजळगाव मल्लखांब असोसिएशनचे अध्यक्ष राजेश जाधव मल्लखांब राष्ट्रीय पंच जयंत जोशी
बाहेती शाळा क्रीडाशिक्षक हरी शेळके. मल्लखांब असोसिएशन कार्याध्यक्ष प्रशांत काळे
मल्लखांब राज्य पंच नरेंद्र भोई ,धनराज भोई वरणगाव
अरुण सपकाळे आदी मान्यवर प्रमुख पाहुण्यांचा कृपाळू शिव साई संस्थान तर्फे यथोचित शाल पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्र संचालन. उमेश सोनवणे यांनी केले. कार्यक्रम यशस्वितेसाठी अध्यक्ष विवेक जगताप उपाध्यक्ष प्रदीप पाटिल ,सचिव उमेश सोनवणे,
कोषाध्यक्ष प्रभूलाल व्यास ,ज्येष्ठ सदस्य दिनकर सोनवणे
कार्यालय प्रमुख गणेश सपके सदस्य मनोज चौधरी
पुजारी रमेश निकम, कवी कासार सचिन सोनवणे स्वप्नील जगताप,प्रदीप पाटील,पंकज शर्मा,अशोक जगताप,धीरज नारखेडे, भावेश बागुल ,तेजस गुंठे दिप पाटिल यांनी परिश्रम घेतले. देविदास कॉलनी,ईश्वर कॉलनी, लक्ष्मी नगर परिसरातील महिला पुरुष विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.