जळगाव
जळगांव जिल्हयातील जनतेने छत्रपती शिवाजी महाराजांचा जाज्वल्य इतिहास अनुभवावा
पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचे आवाहन
जळगांव दि.१७ : जळगांव जिल्ह्यातील तमाम नागरिकांना विनंती करतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक संचालनालय आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने दिनांक १८,१९,आणि २०फेब्रुवारी असे ३ दिवस छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित जाणता राजा या महानाट्याचे जळगांव येथील पोलीस कवायत मैदान येथे आयोजन करण्यात आले आहे.जळगांव जिल्ह्यातील जनतेने हा जाज्वल्य इतिहास अनुभवावा व जास्तीत जास्त संख्येने महानाट्याचा लाभ घ्यावा असे आवाहन महाराष्ट्र शासनाच्या वतीने पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री जळगांव जिल्हा ना .गुलाबराव पाटील यांनी केले आहे.