जळगावधार्मिकसामाजिक

जळगाव नगरीचे ग्रामदैवत श्रीराम मंदिर संस्थानच्या रथोत्सवाची तयारी पूर्ण : १५३ वर्षांची परंपरा

| लोकमाध्यम न्युज जळगाव | दि. १ नोव्हेंबर २०२५ : जळगाव नगरीचे ग्रामदैवत व वारकरी संप्रदायाची थोर परंपरा लाभलेले श्रीराम मंदिर संस्थान (रामपेठ) जळगावचे विद्यमाने कार्तिकी प्रबोधनी एकादशी निमित्त प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही भव्य श्रीराम रथ यात्रेचे कार्तिकी प्रबोधिनी एकादशी रविवार दि. २ नोव्हेंबर रोजी होत आहे व यासाठीची संपूर्ण तयारी झाली असून जळगाव नगरी श्रीराम रथोत्सव मोठ्या हर्षोल्हासात साजरा करण्यासाठी सज्ज झाली आहे. या रथोत्सवाकरिता अवघ्या महाराष्ट्राच्या विविध भागातून असंख्य भाविक दर्शनासाठी येत असतात. प्रत्यक्ष पंढरीचे पांडुरंग जळगावी येतात अशी भाविकांची श्रध्दा आहे.

कार्तिकी एकादशीनिमीत्त रविवार दि.२ रोजी पहाटे चार वाजता काकड आरती, प्रभू श्रीरामांच्या उत्सव मूर्तीस महाभिषेक, सकाळी सात वाजता महाआरती, सकाळी साडेसात ते साडेआठ सांप्रदायिक परंपरेचे भजन त्यानंतर मंदिराच्या प्रांगणात सकाळी साडेदहा वाजता श्रीराम रथाचे महापूजन वंशपरंपरेने श्रीराम मंदिर संस्थांचे प्रमुख विश्वस्त, विद्यमान पंचम गादीपती हरिभक्ती परायण श्री मंगेश महाराज जोशी (श्री अप्पा महाराजांचे पाचवे वंशज) यांचे हस्ते व शहरातील समस्त ब्रह्मवृंद मंडळी यांच्या वेद मंत्र घोषात होईल.

या रथोत्सवाकरिता अवघ्या महाराष्ट्राच्या विविध भागातून असंख्य भाविक दर्शनासाठी येत असतात. प्रत्यक्ष पंढरीचे पांडुरंग जळगावी येतात अशी भाविकांची श्रध्दा आहे. वारकरी संप्रदायाचे थोर संत व श्रीराम मंदिर संस्थानचे मुळ सत्पुरूष संत अप्पा महाराज यांनी १७९४ साली हिंदू समाजातील १८ पगडजाती एकत्र करून हा रथोत्सव सोहळा प्रारंभ केला. आज १५३ वर्षे झाली जळगावकरांच्या असंख्य भाविक नागरीकांच्या सहकार्याने हा रथोत्सवाचा नंदादिप अखंडपणे तेवत आहे.

वंशपरंपरेने ह.भ.प.श्री.मंगेश महाराजांचे हस्ते श्रीराम रथाची महाआरती होवून संस्थानतर्फे उपस्थित प्रमुख अतिथी व रथोत्सवाचे मानकरी सेवाधारी यांचा सत्कार करण्यात येईल. त्यानंतर श्रीराम रथावर आरूढ होणारी प्रभू श्रीरामचंद्रांची उत्सवमूर्तीची आरती होवून रथावर मुर्ती विराजमान होईल. रथावर गरूड, मारुती, अर्जुन, दोन घोडे, इ. मुर्त्या तसेच पुष्पहारांनी सजवलेल्या श्रीराम रथाच्या दिंडीस सोहळ्यास प्रभु श्रीरामांच्या जयघोषात प्रारंभ होईल. रथाचे अग्रभागी सनई, नगारा वादन, चौघडा, झेंडेकरी, बँन्ड पथक, वारकरी सांप्रदायिक भजनी मंडळ, वावडदा, कुंवरस्वामी भजनी मंडळ वाघोड, व्यंकटेश भजनी मंडळ, देवपिंप्री, श्रीराम भजनी मंडळ, मेहरूण, तसेच आसपासचे खेडयावरील भजनी मंडळी, श्री संत मुक्ताबाईच्या पादुका असलेली पालखी व त्यामागे श्रीरामस्थ, असा भव्यदिव्य जलग्रामनगर दिंडी प्रदक्षिणा रथयात्रेस मिरवणुकीस सकाळी १२ वाजता श्रीराम मंदिर येथून प्रारंभ होईल.

माजी मंत्री गुलाबराव देवकर, खासदार उज्वल निकम, रोहित निकम, विष्णु भंगाळे, बंडु काळे, जळगाव रोटरी क्लबचे अध्यक्ष गिरीश कुलकर्णी तसेच जळगाव शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर रामभक्तांच्या उपस्थितीत तसेच श्रीराम मंदिर संस्थानचे समस्त विश्वस्त मंडळी, भरत अमळकर, भालचंद्र पाटील, ऍड. सुशील अत्रे, विजय जोशी, शिवाजी भोईटे, जयवर्धन नेवे, रथोत्सव समितीचे अध्यक्ष भालचंद्र पाटील, कार्याध्यक्ष प्रभाकर पाटील, संजय चौधरी सदस्य, भानुदास चौधरी, विलास चौधरी, जयवर्धन नेवे, शिवाजी भोईटे, सुजित पाटील, तसेच रथोत्सवाचे मानकरी सेवाधारी यांच्या उपस्थितीत प्रारंभ होईल.

या रथोत्सवाचे यशस्वीतेसाठी श्रीराम मंदिर संस्थान प्रमुख विश्वस्त विद्यमान गादीपती ह.भ.प. गुरुवर्य मंगेश महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्थानचे विश्वस्त मंडळी भरत अमळकर, भालचंद्र पाटील, खासदार उज्वल निकम, रोहित निकम, जळगाव रोटरी क्लबचे अध्यक्ष गिरीश कुलकर्णी, सुशील अत्रे, शिवाजीराव भोईटे, विजय जोशी, जयवर्धन नेवे, व रथोत्सव समितीचे अध्यक्ष भालचंद्र पाटील, कार्याध्यक्ष प्रभाकर पाटील, सदस्य, भानुदास चौधरी, विलास चौधरी, संजय चौधरी, सुजित पाटील, पितांबर चौधरी, राजेंद्र काळे, दिगंबर खडके, मुकुंदा पाटील, अरूण मराठे, आशिष पाटील, दिलीप खडके, देवेश शुक्ल, मुकुंद पाठक, देविदास बारी, भास्कर चौधरी, मुकुंद शुक्ल, सुनिल शिंपी, सदाशिव तांबट, गणेश धर्माधिकारी, नंदु शुक्ल, महेंद्र जोशी, प्रणव जोशी, विकास दायमा, जयेश पाटील, राजेंद्र जोशी, रमाकांत जोशी, पराग जोशी, विनायक जोशी, विनय जोशी, उदय बुवा, तानाजी बारी, केशव बारी, घनश्याम चौधरी, दिलीप राजपूत, मधुकर चौधरी, योगेश कासार, संजय कोरके, सुनिल पाटील, यशवंत खडके, दिनेश धांडे, गजानन फडे, सिध्दांत फडणीस, राजू कोळी व समस्त श्रीराम भक्त, मानकरी सेवेकरी या मंडळींनी परिश्रम घेतले आहे.

रथाचा मार्ग 

श्रीराम मंदिर, भोईटे गढी, आंबेडकर नगर, तेली चौक, श्रीराम मंदिराचे मागील गल्लीतून, रथचौक, बोहरागल्ली, सुभाष चौक, सराफ बाजारातील श्री महालक्ष्मी मंदिर येथे भजनाचा कार्यक्रम होवून श्री मरिमाता मंदिर, भिलपुरा मार्गे भिलपुरा येथील श्री संत अप्पा महाराजांचे परममित्र श्री संत लालशाबाबा यांची समाधी येथे श्रीराम रथाचे सेवाधारी रामसेवक माल्यार्पण करतील. बालाजी मंदिर, रथचौकात रथ रात्री बारा वाजता येईल. प्रभू श्रीरामांच्या उत्सवमुर्तीस पालखीत ठेवून वाजतगाजत श्रीराम मंदिरात आणण्यात येईल.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button