जळगावधार्मिक

कलियुगात शिवभक्ती अतिशय श्रेष्ठ भक्ती : देवदत्त महाराज

गणपती व रुद्र पूजनाने शिवपुराण कथेस प्रारंभ

| लोकमाध्यम न्यूज | जळगांव २२ मार्च २०२५ |

जुने जळगाव येथील का.ऊ.कोल्हे विद्यालय मागील दशरथ नगर येथे श्री शिव महापुराण कथेस प्रारंभ झाला असून दिनांक २१ मार्च ते २७ मार्च दरम्यान रोज संध्याकाळी ७ ते १० ह्या वेळात भव्य संगीतमय श्री शिव महापुराण कथा होणार असून
कथेसाठी भव्य व्यासपीठ करण्यात आले आहे. आकर्षित १४ फूट उंच शिवलिंग मूर्ती कथेची आकर्षण बनली आहे. ह.भ.प.देवदत्त महाराज हे कथेचे निरूपण करत असून कथा श्रावणासाठी उत्तम बैठक व्यवस्था करण्यात आली आहे, कथेच्या पहिल्याच दिवशी दशरथ नगर व पंचक्रोशीतून भाविकांची प्रचंड उपस्थिती होती.

शिव महापुराणाचे महत्त्व तसेच कलियुगाचे वर्णन कथेच्या पहिल्या दिवशी सांगण्यात आले शिवनाम हे मनुष्याचे उद्धार करणारे असून शिव नामांनी कल्याण होते व जीवाचा उद्धार होतो. देव दानव आणि मानव हे शिवांचे भक्त आहेत कलियुगात शिव भक्ती ही अतिशय श्रेष्ठ भक्ती सांगण्यात आलेली आहे. शिवपुराण कथा ही मनाला आनंद देणारी सुंदर अशी कथा असून कलियुगात जो याचं श्रवण करतो त्या प्रत्येक जीवाला आत्मिक समाधान प्राप्त होते.
कथेला प्रारंभ करत असताना गणपती पूजन तसेच रुद्र पूजन वेदशास्त्र संपन्न स्वप्नील शुक्ल गुरुजी व मुकुंद शुक्ल गुरुजी यांच्या वेदमंत्रांमधून करण्यात आले. संगीतमय कथेसाठी प्रकाश अहिरे, कैलास परदेशी, राजेंद्र देशपांडे, शंभू सुतार तसेच सोपान पाटील यांची साथ संगत लाभत आहे. जास्तीत जास्त भाविकांनी कथा श्रावणाचा लाभ घ्यावा असे आवाहन युवा दशरथ नगर मित्र मंडळ व पवन रामदास कोळी यांनी केले आहे.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button