डॉ.अनुज पाटील यांचा प्रचाराचा जोरदार झंजावात सुरू
लोकमाध्यम न्युज | जळगांव ६ नोव्हेंबर २०२४ |
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जळगाव शहराचे अधिकृत उमेदवार डॉ.अनुज पाटील यांच्या प्रचाराचा नारळ
शाहूनगर येथील तपस्वी हनुमान मंदिरात वाढवून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते माजी आमदार ऍड जयप्रकाश बाविस्कर यांनी शुभारंभ केला.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार डॉ. अनुज पाटील यांच्या प्रचार दौऱ्याला जळगावच्या कणखर जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
डॉ. अनुज पाटील यांच्या स्वागताला ज्येष्ठ नागरिक, माता भगिनी यांच्याकडून आशीर्वाद मिळाले, अनेक बहिणींच्या ओवाळणीतून कौटुंबिक प्रेम दिसलं. सोबत असलेल्या प्रत्येक निष्ठावान कार्यकर्त्याने लोकांच्या मनात नव्या जोमाची आणि परिवर्तनाच्या आशेची ज्योत प्रज्वलित केली.
जनतेचे हे प्रेम म्हणजे फक्त उमेदवारावरचा विश्वास नसून, ते एक संकल्प आहे. जळगावच्या उज्ज्वल भविष्याचा. प्रत्येकाने आपल्या घरातील प्रश्न मांडले आणि डॉ. पाटील यांनी त्या समस्या आपल्याच घरातील मानून त्यावर तोडगा काढण्याचं वचन दिलं.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर विश्वास दाखवणारे नागरिक आपले बांधव आहेत, आणि त्यांच्या प्रश्नांवर तोडगा काढणे ही आपली जबाबदारी आहे. बदलाची नवी सकाळ आणण्यासाठी जनतेने दाखवलेला हा भरघोस प्रतिसाद आमचं बळ आहे. त्यांच्या या असीम पाठिंब्याला आम्ही सलाम करतो आणि आश्वासन देतो की, ही लढाई केवळ निवडणुकीची नसून एका नव्या युगाच्या उभारणीसाठीची आहे असे प्रतिपादन डॉ. अनुज पाटील यांनी केले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार डॉक्टर अनुज पाटील यांचा आजचा प्रचार दौरा शाहू नगर, जे.डी.सी.सी. बँक कॉलनी, पोलीस परेड ग्राउंड, प्रताप नगर, गिरणा वसाहत, इंडिया गॅरेज परिसर, तुकाराम वाडी, जानकी नगर, गणेश वाडी, भास्कर मार्केट पोलीस मुख्यालय, गणेश नगर, दंगल ग्रस्त कॉलनी या परिसरात झाला.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष ऍड जमील देशपांडे, महानगरअध्यक्ष किरण तळले, उपमहा नगर अध्यक्ष सतीश सैंदाणे, चेतन पवार, जनहितचे राजेंद्र निकम, श्रीकृष्ण मेंगळे, विद्यार्थी सेनेचे योगेश पाटील, साजन पाटील जितेंद्र पाटील, ललित शर्मा, आशुतोष जाधव, यांच्यासह डॉ.अनुज पाटील यांच्या परिवारातील सदस्य
महेंद्र पाटील, यशस्वी पाटील, रेखा पाटील, डॉ.जानकीराम पाटील, प्रकाश पाटील, डॉ.लीना पाटील, डॉ, के डी पाटील, डॉ.अभिजीत पाटील, डॉ.अजय सोनवणे, कुणाल पाटील, सिद्धार्थ पाटील, डॉ.मौसमी पाटील, हितेश पाटील, शरीफ खान, राहुल पाटील, सागर पाटील, प्रवेझ शाह, अर्जुन साळुंखे, उपस्थित होते.