जळगांव जिल्हाऔद्योगिक

जळगाव येथे १६ मार्च रोजी प्लेसमेंट ड्राईव्ह; विविध पदांसाठी जागेवर मुलाखती

| लोकमाध्यम न्युज | जळगाव ( जिमाका)-: जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव यांच्या वतीने १६ मार्च २०२६ रोजी सकाळी १० वाजता शासकीय तांत्रिक विद्यालय परिसर, जी.एस. ग्राउंड जवळ, जळगाव येथे प्लेसमेंट ड्राईव्ह आयोजित करण्यात आला आहे.

या प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये छबी इलेक्ट्रिकल्स तसेच सुप्रीम इंडस्ट्रीज लि., जळगाव यांसारख्या नामांकित उद्योगसंस्था सहभागी होणार असून विविध पदांसाठी मुलाखती घेतल्या जाणार आहेत.

 

ड्रिपलाईन मशीन ऑपरेटर, एचडीपीई लाईन इंजिनिअर, मेंटेनन्स इंजिनिअर, रॉ मटेरियल स्टोअर मॅनेजर, अकाउंट ऑफिसर, क्वालिटी टेक्निशियन, प्रोडक्शन इंजिनिअर, लॉजिस्टिक अँड अकाउंट असिस्टंट, स्टोअर/परचेस इंजिनिअर आदी पदांसाठी संधी उपलब्ध आहेत. यासाठी बी.कॉम, एम.कॉम, बीएस्सी (फिजिक्स), बी.ई., डिप्लोमा, एमबीए (फायनान्स) अशा शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार पात्र राहतील.

इच्छुक उमेदवारांनी https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करून उपलब्ध रिक्त पदांसाठी आपल्या युजर आयडी व पासवर्डने लॉग-इन करून अर्ज करावा. ज्या उमेदवारांनी नोंदणी केलेली नाही त्यांनीही सर्व शैक्षणिक कागदपत्रांसह मुलाखतीच्या दिवशी उपस्थित राहावे.

अधिक माहितीसाठी कार्यालयीन वेळेत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, शासकीय तांत्रिक विद्यालय परिसर, जी.एस. ग्राउंड जवळ, जळगाव येथे प्रत्यक्ष संपर्क साधावा किंवा दूरध्वनी क्रमांक ०२५७-२९५९७९० वर संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त संदीप गायकवाड यांनी केले आहे.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button