जळगावमहानगर

गणेशोत्सव विसर्जन काळात शहरातील वाहतुक मार्गात बदल

जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांचे आदेश

लोकमाध्यम न्युज | जळगाव १३ सप्टेंबर २०२४ |

शहरात 07 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर या कालावधीत गणेशोत्सव साजरा होत असून शहरातील सार्वजनिक, खाजगी, व घरगुती श्री गणेश मुर्तींचे विसर्जन मिरवणुकांसाठी होणारी गर्दी पाहता शहरातील वाहतुक मार्गात बदल करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिले आहेत.

जळगाव ते पाचोऱ्या वरुन येणाऱ्या व जाणाऱ्या एस टी बसेस, अवजड वाहने करीता इच्छादेवी चौकी – डी मार्ट – मोहाडी रोड Y पॉईंट – गायत्री नगर – गणेश घाट – सेंट टेरीसा स्कुल – हॉटेल ग्राप्पेस – मलंगशहा बाबा दर्गा – शिरसोली रोड वरील वाहतुक जळगाव कडे येणा-या व जाणा-या एस.टी. बसेस व इतर सर्व प्रकारचे अवजड वाहने विसर्जन दरम्यान बंद राहील. तसेच जळगाव ते पाचोरा येणारी व जाणारी वाहतुक (हलक्या व मध्यम वाहनाकरीता) – इच्छादेवी चौकी – डि मार्ट – मोहाडी रोड Y पॉईंट – गायत्री नगर – गणेश घाट – सेंट टेरीसा स्कुल – हॉटेल ग्रॅपेस – मलंगशहा बाबा दर्गा – शिरसोली रोड वरील वाहतुक जळगाव कडे येणा-या व जाणा-या सर्व मध्यम व हलक्या वाहनांकरीता मार्ग बंद राहिल.

जळगाव कडून पाचोऱ्याकडे जाणा-या कार व मोटार सायकल करीता आकाशवाणी चौक – काव्यरत्नावली चौक – महाबळ चौक – संत गाडगेबाबा चौक – राजे संभाजी चौक (मोहाडी रोड) – गुरू पेट्रोलपंप (G मॉल) – मलंगशहा बाबा दर्गा मार्गे पाचोरा कडे आणि पाचोऱ्याकडून जळगाव कडे येणा-या कार व मोटार सायकलसाठी मलंगशहा बाबा दर्गा – गुरू पेट्रोलपंप (G मॉल) – राजे संभाजी चौक (मोहाडी रोड) – संत गाडगेबाबा चौक – महाबळ चौक – काव्यरत्नावली चौक – आकाशवाणी चौक मार्गे जळगाव कडे पर्यायी मार्ग असणार आहे.

आसोदा- भादली कडून जळगाव कडे येणा-या व जाणा-या एस.टी. बसेस व इतर सर्व वाहने मंगळवार दिनांक 17 सप्टेंबर 2024 सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपावेतो या कालावधीत मोहन टॉकीज – गजानन मालुसरे नगर – जुने जळगाव – लक्ष्मी नगर – कालंका माता मंदीर मार्गे – महामार्गावरुन अजिंठा चौक – आकाशवाणी चौक – नविन बस स्टॅण्ड या मार्गाचा वापर करु शकतील. पाचोरा कडून येणा-या जड वाहनांन करीता वावडदा – नेरी – अजिंठा चौक मार्गे जळगांव पर्यायी मार्ग असणार आहे असेही डॉ. रेड्डी आपल्या आदेशात म्हटले आहे.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button