लोकमाध्यम न्युज | जळगाव ४ सप्टेंबर २०२४ |
जळगाव शहराला पाणीपुरवठा करणारे 22 किलोमीटरवरील वाघूर धरण यंदा वरुणराजाच्या कृपादृष्टीमुळे 100 टक्के पूर्ण भरले आहे.
त्या अनुषंगाने हिंदू संस्कृतीची जपणूक करीत कृतज्ञता म्हणून बुधवार, दि. 4 सप्टेंबर 2024 रोजी शहराचे आमदार सुरेश भोळे राजूमामा व माजी महापौर सौ.सीमाताई भोळे यानी सपत्नीक धरणस्थळी. वाघूर नदीचे साडी चोळी, श्रीफळ, पुष्पहार अर्पण करून जलपूजन केले आणि परमेश्वराचे आभार मानले.
यावेळी तापी पाटबंधारे महामंडळाचे अभियंता पी. एम. पाटील, महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता योगेश बोरोले, सहाय्यक अभियंता विशाल सुर्वे, तापी पाटबंधारे सहाय्यक अभियंता अजय जाधव यांच्यासह कर्मचारीवर्ग उपस्थित होता.
या प्रसंगी आ.राजूमामा भोळे यांनी वाघूर धरण असेच यापुढेही सदैव 100 टक्के भरून या धरणाच्या पाण्यावर विसंबून असलेल्या जळगाव शहरासह जामनेर, भुसावळ तसेच अन्य परिसरातील गावांना लाभ मिळू द्यावा व सर्वत्र सुख-समृद्धी नांदावी, अशी आर्त आळवणी वरुणदेवताचरणी लीन होऊन केली. वाघूर धरणाचे बांधकाम 1978 मध्ये झाल्यापासून आतापर्यंत ते चार वेळा 100 टक्के भरले आहे. पुढील दोन वर्षांसाठी जळगाव शहराच्या जलसाठ्यात भर पडली असून नागरिकांची जल चिंता ही मिटली आहे.