स्मिता वाघांना न्याय्य..तर रक्षा खडसेंना हॅटट्रिक ची संधी
जळगाव दि १३ (पांडुरंग महाले) : आगामी लोकसभा निवडणूक रणधुमाळीच्या घोषणे आधी आज भाजपाने लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. यामध्ये दोन्ही विद्यमान खासदारांपैकी जळगाव च्या खासदाराचे तिकीट कापून जळगाव आणि रावेर दोन्ही लोकसभा मतदार संघात अनुभवी महिला उमेदवारांना पसंती देत प्राधान्याने तिकीट देण्यात आले आहे.
गेल्या लोकसभा निवडणुकीत स्मिता वाघ यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र ऐन वेळी त्यांचे तिकिट कापून तेव्हाचे आमदार उन्मेष पाटील यांना तिकिट देण्यात आले होते. मात्र आता खासदार असलेले आणि तिकिटासाठी दावेदार असलेले उन्मेष पाटील यांचे तिकीट कापून स्मिता वाघ यांना तिकीट देण्यात आले आहे. एका प्रकारे एकाचे तिकीट कापत दुसऱ्याला आणि दुसऱ्याचे तिकीट कापत पहील्याला अशा प्रकारे.पाच वर्षानंतर वर्तुळ पूर्ण करत राजकारणात काहीही होऊ शकते हे सिद्ध केलेले आहे.
अलीकडे खासदार उन्मेष पाटील यांनी मतदार संघात साधारणः दोन ते अडीच वर्षांपासून चांगलाच लोकसंपर्क वाढविला होता. त्यांना तिकीट मिळण्याची पण खात्री पण होती.मात्र तिकीट कापले गेल्याने त्यांच्या होतात नाराजी पसरली आहे.
स्मिता वाघांचा अभाविप आणि पक्ष संघटनेतील प्रदीर्घ अनुभव पाहता त्यांना उमेदवारी देऊन पक्षाने एका प्रकारे त्यांना न्यायच दिला आहे.
दुसरी कडे रावेर लोकसभा मतदार संघातून पत्ता कट होण्याचा धाक असताना मात्र विद्यमान खासदार रक्षा खडसे यांना तिसऱ्यांदा पुन्हा उमेदवारी दिली असून त्यांना हहॅटट्रिक साधण्याची संधी मिळाली आहे. त्यांना दहा वर्षांचा खासदारकीचा अनुभव असून त्यांचा रावेर मतदार संघात दांडगा लोकसंपर्क आहे .