धरणगाव शहरातील शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश
लोकमाध्यम न्युज | जळगांव २ नोव्हेंबर २०२४ |
धरणगाव येथील वैदु समाजाचे प्रमुख शिवदास वैदू व गुलाबराव पाटील यांचे खंदे समर्थक पापा वाघरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शुक्रवार १ नोव्हेंबर रोजी शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.गुलाबराव पाटील यांनी शहरात भरघोस विकास कामे केली त्याचबरोबर राजकारण न करता सर्व स्तरातील लोकांना बरोबर घेऊन काम करण्याची कार्यपध्दती बघता हा पक्ष प्रवेश केला असे शिवदास वैदू यांनी सांगितले.
त्यांना युवा नेते जि प सदस्य प्रतापराव पाटील,उपजिल्हा प्रमुख माजी नगराध्यक्ष पी एम पाटील सर,शहरप्रमुख विलास महाजन यांनी प्रवेश दिला.
या प्रसंगी शिवसेनेत प्रवेश करणारे जितू चव्हाण,बाबा पचेरवार,पृथ्वी पचेरवार,पवन पचेरवार,भैय्या गुरु वैदु,गुरु बिच्छा वैदु,मच्छिंद्र वैदु,सुभाष लक्ष्मण सोनवणे,बिच्छा बापू वैदु, मच्छिंद्र वैदू,नथू वैदू,तात्या वैदु, राजू तात्या वैदु,बापू लक्ष्मण वैदु,शिवदास लक्ष्मण सोनवणे, गुरु वैदु,तात्या दत्तू वैदु,संजू दत्तू वैदु,सुकलाल वैदु,राहुल वैदु,संजय वैदु,विशाल सोनवणे, गणेश वैदु,सुनील वैदु,अजय वैदु,सागर वैदु,रोहित वैदु,दीपक वैदु,सागर वैदु,सिकंदर वैदु,विनोद वैदु,सुनील वैदु,गणेश वैदु,राजू वैदु,दीपक वैदु,अजय वैदु,परशुराम वैदु,मुकेश सोनवणे, विजय सोनवणे,अनिल सोनवणे,विनोद वैदु,गुप्ता वैदु,विशाल वैदु,अशोक वैदु,राधे वैदु,अर्जुन वैदु,दशरथ सोनवणे,करण वैदु,विजय वैदु,सागर वैदु,गुड्ड्या वैदु,तात्या वैदु,गणेश वैदु,दीपक वैदु,राजेंद्र वैदु,दिगंबर वैदु,भिका वैदु,राजेंद्र वैदु,विशाल वैदु,निंबा वैदु,राहुल वैदु,भिकाजी वैदु,दुर्गाजी वैदु,अनिल वैदु,रामा वैदु यांनी शिवसेनेत प्रवेश केला याप्रसंगी शिवसेना परिवाराचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.