कुणी दिले लिंबू सरबत, कुणी खाऊ घातली पाणीपुरी, कचोरी तर कुणी केक..!
राजुमामां वरील प्रेम दिवसेंदिवस वाढतच आहे, शहरातील मार्केट परिसरात जोरदार स्वागत
लोकमाध्यम न्युज | जळगांव १४ नोव्हेंबर २०२४ |
जळगाव (प्रतिनिधी) : आपल्या हक्काच्या माणसाला कोणी लिंबू सरबत पाजले, तर कोणी पाणीपुरी, कचोरी खाऊ घातली, तर कोणी केक, मिठाई खाऊ घालत व्यापारी, दुकानदारांनी आ. राजूमामा भोळे यांच्यावरील प्रेमाला आणखीन घट्ट केले. हे दृश्य होते मंगळवारी संध्याकाळी भाजप, शिवसेना महायुती सरकारने काढलेल्या रॅलीतील. मंगळवारी गोलाणी मार्केट, महात्मा फुले, केळकर मार्केट परिसरात प्रचार रॅलीत आ. राजूमामा भोळे यांनी व्यापारी, दुकानदारांच्या भेटी घेऊन शुभाशीर्वाद घेतले.
आ. राजूमामा भोळे यांनी प्रचारात दिवसेंदिवस आघाडी घेतली असून गेल्या ८ दिवसात अर्धे जळगाव शहर व्यापले आहे. मंगळवारी आ. राजूमामा भोळे यांनी गोलाणी मार्केट मधील दक्षिणमुखी हनुमान मंदिर येथे पूजा अर्चा करून प्रचाराला सुरुवात केली. गोलाणी मार्केट, नवी पेठ, केळकर मार्केट, महात्मा फुले मार्केट मार्गे गांधी मार्केट येथे रॅलीचा समारोप करण्यात आला. गोलाणी मार्केट येथे व्यापाऱ्यांशी हितगुज करून आ. भोळे यांनी विविध प्रश्नांवर चर्चा केली.
यावेळी, “राजूमामा, आज तुमच्या विजयाचे गणित पक्के आहे, तुम्ही नक्की विजयश्री मिळवाल” असा विश्वास व्यापाऱ्यांनी दिला. गोलाणी मार्केट परिसरात एका दुकानदाराने लिंबू सरबत पिण्यास देत तर नवी पेठ परिसरात एका दुकानदारांनी केक भरवत आ. भोळेंना शुभेच्छा दिल्या. तर केळकर मार्केट परिसरात एका विक्रेत्याने पाणीपुरी व कचोरी खाऊ घालून आ. भोळे यांच्यावरील आपले प्रेम व्यक्त केले.
रॅलीत माजी जिल्हा उपाध्यक्ष नितीन इंगळे, विधानसभा क्षेत्र प्रमुख विशाल त्रिपाठी, महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, मंडळ क्र. २ चे अध्यक्ष राहुल घोरपडे, माजी नगरसेवक कैलास सोनवणे, जितेंद्र मराठे, अमित देशपांडे, राजू खेडकर, गोपाल पोपटानी, राहुल सनकत, जगदीश जोशी, अजय गांधी, कैलास सोनवणे, प्रवीण पाटील, दिशांत जोशी, संगीता समदानी, गीता नागला, शिवसेनेचे कुंदन काळे, हर्षल मावळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विनोद देशमुख, अर्चना कदम, लोक जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दीपक सपकाळे, आनंदा सपकाळे, पिरीप पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजूभाई मोरे, आरपीआय आठवले गटाचे महानगराध्यक्ष अनिल अडकमोल, मिलिंद अडकमोल, प्रताप बनसोडे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.