जळगांव दि २७ : आज सादर झालेल्या राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पातून राज्यातील सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. सर्वच समाज घटकांसाठी हा दिलासादायक अर्थसंकल्प आहे.अशी प्रतिक्रिया भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा डॉ केतकी पाटील यांनी व्यक्त केली आहे .
ग्रामसडक योजनेपासून शहरी मार्ग, चौपदरी महामार्गांसह रेल्वेमार्गांच्या भूसंपादनासाठी तरतूद करत पायाभूत सुविधांचे जाळे मजबुतीवर भर देण्यात आला आहे. निराधारांचा आधार असलेल्या संजय गांधी निराधार योजनेचे पेन्शन १ हजार रुपयांवरुन १५०० रुपये करण्यात आले आहे. प्रत्येक तालुक्यासाठी शववाहिका, संत गाडगेबाबा महामंडळाची स्थापना या घोषणा सामान्यांसाठी मोठी उपलब्धी आहे. उद्योग, कृषि, क्रीडा क्षेत्रासाठी आवश्यक तरतुदींचा यात समावेश रोजगार उपलब्ध होणाऱ्या योजनांचाही उल्लेख आहे. जालना- जळगाव रेल्वेमार्गासाठी ५० टक्के आर्थिक सहभाग आपल्या खानदेशासाठी महत्त्वपूर्ण टप्पा आहे. एकूणच सर्वच समाज घटकांसाठी हा दिलासादायक अर्थसंकल्प असल्याचे डॉ केतकी पाटील, प्रदेश उपाध्यक्षा, महिला मोर्चा, भाजपा यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे..