मनसेचे उमेदवार डॉ.अनुज पाटील यांच्यावर फुलांची उधळण: एमआयडीसी भागात प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद..
लोकमाध्यम न्युज | जळगांव १६ नोव्हेंबर २०२४ |
अयोध्यानगर,एमआयडीसी,जगवानी नगर परिसरात डॉ. अनुज पाटील यांच्या प्रचारादरम्यान नागरिकांकडून मोठा उत्साह पाहायला मिळाला. डॉ. पाटील यांचे आगमन होताच नागरिकांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले आणि फुलांची उधळण करत त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव केला.
या प्रचारादरम्यान डॉ. पाटील यांनी त्यांच्या विकासात्मक योजना आणि भविष्यातील उपक्रमांची माहिती दिली. त्यांनी स्थानिक समस्या ऐकून घेतल्या आणि त्यावर तातडीने उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले. त्यांच्या साधेपणामुळे आणि कार्यशैलीमुळे नागरिकांमध्ये एक वेगळा विश्वास निर्माण झाला आहे.
कार्यकर्त्यांनीही जोरदार प्रचार मोहीम राबवली, ज्यामुळे प्रत्येक वयोगटातील नागरिकांचा मोठा पाठिंबा मिळाला. महिलावर्ग, युवक, तसेच ज्येष्ठ नागरिकांनी डॉ. पाटील यांना आपले समर्थन दर्शवत त्यांच्या कार्याबद्दल प्रशंसा केली.
एमआयडीसी भागात उमटलेला हा सकारात्मक प्रतिसाद आगामी निवडणुकीत डॉ. अनुज पाटील यांना मोठा फायदा देऊ शकतो याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.