लोकमाध्यम न्युज | जळगांव ३ नोव्हेंबर २०२४ |
जळगाव नगरीचे ग्रामदैवत श्रीराम मंदिर संस्थान (रामपेठ) जळगावचे विद्यमाने अवघ्या कान्हदेशाचे सांस्कृतिक, आध्यात्मिक वैभव असलेला व गेली १५२ वर्षे अव्याहतपणे संपन्न होत असलेला श्रीराम रथोत्सव यंदाही उत्साहात संपन्न होत असून हिंदू धर्मातील अठरा पगड जाती जमातींना एकत्र करून सदगुरु श्री संत अप्पा महाराज यांनी शके १७९४ (सन १८७२) मध्ये सुरू केलेला संस्थानचा सर्वोच्य मानबिंदू असलेला श्रीराम रथोत्सव यंदा १५२ व्या वर्षांत पदार्पण करीत असून २ नोव्हेंबर पासून वहनोत्सवास प्रारंभ झाला आहे. १२ नोव्हेंबर २०२४ कार्तिकी प्रबोधिनी एकादशीच्या पावन दिनी श्रीराम रथोत्सव संपन्न होत आहे.
या रथोत्सवाच्या दर्शनाकरिता महाराष्ट्रातील विविध भागातून हजारोंच्या संख्येने भाविक यानिमित्त जळगावला येत असतात. परंपरेप्रमाणे कार्तिक शु. प्रतिपदा ते त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत दि. १५ नोव्हेंबर २०२४ पर्यंत हा उत्सव संपन्न होत असून व या उत्सवात प्रतिदिनी रोज सकाळी पहाटे ५.०० वाजता काकडा आरती, प्रभू रामरायांची पूजा अभिषेक, विष्णूसहसहस्त्रनाम तुळसी अर्चना, सकाळी ७.०० वाजता मंगलारती , दुपारी ११.३० ते १२,००, माध्यन्ह पूजा, नैवेद्य आरती, दुपारी ४.०० ते ५.०० सामुदायीक श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज हरिपाठ, संध्याकाळी ५,०० ते ६.०० नित्यनेमाने चक्री भजन, संध्याकाळी ६.०० ते ६.३० संध्यापूजा, धुपारती संध्याकाळी ७.०० वाजता श्रीराम मंदिरापासून वहन व दिंडीस प्रारंभ झाला, नित्य वहन प्रस्थान आरती परंपरेने श्रीराम मंदिर संस्थानचे विद्यमान गादीपती ह.भ.प. मंगेश महाराज यांच्या शुभ हस्ते संप्पन झाली . २ नोव्हेंबर कार्तिक शुद्ध बळी प्रतिपदा दिनी पहाटेची उपचार विधी होऊन सकाळी ११ वा. प्रभू रामरायांचे उत्सवमुर्तीस पालखीत विराजमान करून निमखेडी येथील श्रीराम मंदिरात जाऊन श्री सद्गुरू कुवरस्वामी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त भजन पूजन आरती होऊन दुपारी ४ वाजता पालखी
जळगाव श्रीराम मंदिरात परत आली, त्यानंतर प्रथम वहन पूजन श्री सद्गुरू आप्पा महाराजांचे वंशज, श्रीराम मंदिराचे प्रमुख विश्वस्त, वहिवाटदार, विद्यमान गादिपती, ह.भ.प.श्री मंगेश महाराजांचे शुभ हस्ते , श्रीराम मंदिराचे समस्त विश्वस्त मंडळी व रथोत्सव समितीचे अध्यक्ष भालचंद्र पाटील,रथोत्सव समितीचे कार्याध्यक्ष प्रभाकर पाटील, श्रीराम रथोत्सवाचे सेवेकरी जळगाव शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर महोदय यात पीपल्स बॅंकेचे अध्यक्ष अनिकेत पाटील, मुकुंद धर्माधिकारी गुरुजी, नंदू शुक्ल गुरुजी, सुजित पाटील, अरुण मराठे, राजू काळे, मधुकर पाटील, भारत बारि , भूषण न्हावी, ब्रह्मश्री परिवाराचे संस्थापक अशोक वाघ, कमलाकर फडणीस, ॲड. पदभनाभ देशपांडे, मंगेश कुळकर्णी देवदत्त मोरदे महाराज, ओंमकारेश्वर मंदिराचे दिपक जोशी, बाजी प्रभू मंडळाचे राजू कोळी, श्रीराम तरुण मंडळाचे अशोक माळी, युवा केसरी मंडळाचे बापू सपके , दीपक तरुण मंडळाचे बाळासाहेब कासार, देवेश पाठक, अतुल कासार, सेवा भारतिचे संदीप कासार, तसेच असंख्य रामभक्त मंडळी नागरिक उपस्थितीत संपन्न झाला, प्रथम वहनाचे पूजन व आरती संप्पन झाली त्यानंतर मंदिरातील प्रभू श्रीरामांची आरती होऊन, उत्सवमूर्ती वहनावर विराजमान झाली. वहनापुढे श्री संत मुक्ताबाई पादुका पालखी सोबत झेंडेकरी ,टाळकरी, विणेकरी रामभक्त मंडळीसह वहन दिंडी नगर प्रदक्षीणेस निघाली.
वहन मार्ग:- श्रीराम मंदिर, भोईटे गढी,कोल्हे वाडा, आंबेडकर नगर, चौधरी वाडा, तेली चौक, भट गल्ली राम मारुती पेठ ,श्रीराम मंदिराचे मागील गल्ली ,रथ चौक, सराफ बाजार मार्गे, श्री भवानी मंदिर येथे वहन पूजन भजन, भारूड, आरती पानसुपारी , सुभाष चौकातील सुभाष चौक पतसंस्थाचे विद्यमाने पानसुपारी,कार्यक्रम होऊन वहन भिल्लपुरा मार्गे बालाजी पेठेतील श्री बालाजी मंदिरात पानसुपारी भजन भारुड होऊन वहन रथ चौक मार्गे श्रीराम मंदिरात परत आले. मंदिरात पुन्हा शेजारती आरती होऊन सेवेकरी, भजनी मंडळी रामभक्त मंडळींना श्रीफळ प्रसाद देण्यात आला. भाविकांनी उत्सवात दररोज वहन दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्रीराम मंदिर संस्थानने केले आहे. पानसुपारी साठी प्रभाकर पाटील यांच्याशी संपर्क करावा मोबाईल नंबर:- 9422281439 , 9284844819