स्त्रीशक्तीच्या सहभागासह जयश्री महाजन यांचे बाईक रॅलीने शक्तिप्रदर्शन; प्रचाराची सांगता
लोकमाध्यम न्युज | जळगांव १८ नोव्हेंबर २०२४ |
जळगाव, प्रतिनिधी | विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी जयश्री महाजन यांनी जळगाव शहरातून भव्य बाईक रॅली काढत जोरदार शक्तिप्रदर्शन केले. या रॅलीत शेकडो महिला आणि तरुणांनी सहभाग नोंदवला शहरातील विविध प्रमुख रस्त्यांवरून काढण्यात आलेल्या या रॅलीदरम्यान जयश्री महाजन यांनी नागरिकांना अभिवादन केले आणि भरघोस मतदान करण्याचे आवाहन केले. जयश्री महाजन यांच्या नेतृत्वाखालील या शक्तिप्रदर्शनात महिलांनी भगवे फेटे घालून मोठ्या संख्येने सहभाग घेतला. तरुणांनी विकासाच्या मुद्द्यांवर त्यांना पाठिंबा दर्शवला.
रॅलीत शिवसेना जिल्हाध्यक्ष विष्णुभाऊ भंगाळे, शिवसेना महानगर प्रमुख शरदआबा तायडे, जया तिवारी, नीता सांगोळे, ललिता पाटील यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
महाजन यांच्या बाईक रॅलीमुळे शहरात वेगळाच उत्साह दिसून आला. महिलांचा प्रचंड सहभाग आणि तरुण वर्गाचा पाठिंबा पाहून नागरिकांमध्ये चर्चा रंगल्या की, ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध स्त्रीशक्ती आणि जनशक्ती अशा स्वरूपाची बनली आहे. लोकशाहीच्या वाटचालीत हा बदल नवा संदेश देणारा ठरतोय, असे नागरिक म्हणत होते.
शहरातील नागरिकांनी या रॅलीला मोठा प्रतिसाद दिला, ज्यामुळे जयश्री महाजन यांच्या प्रचाराला उर्जितावस्था मिळाली आहे. आता निवडणुकीच्या निकालाच्या प्रतिक्षेत जयश्री महाजन यांच्यासह कार्यकर्ते आहेत.