विविध पक्षातील असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी (अजित पवार गट) पक्षात प्रवेश
असंघटित कामगार विभाग जळगाव तालुकाध्यक्ष पदी चंद्रजित जयवंत चव्हाण तर मालेगाव शहर जिल्हाध्यक्ष पदी शेख सलिम शेख नबी यांची नियुक्ती
![](https://lokmadhyam.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241210-WA0034-780x470.jpg)
लोकमाध्यम न्युज | जळगांव १० डिसेंबर २०२४
जळगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट असंघटित कामगार विभागाचे उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष पी.एस.पाटील व जळगाव लोकसभा मतदारसंघाचे जिल्हाध्यक्ष ॲड प्रदीप पाटील यांच्यावर विश्वास ठेवून जळगाव व मालेगाव जिल्ह्यातुन वेगवेगळ्या पक्षातुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे हात बळकट करण्यासाठी असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रवेश केला.
या प्रवेश सोहळा कार्यक्रमाचे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट असंघटित कामगार विभागाचे उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष पी.एस.पाटील यांनी भुषविले
या प्रवेश सोहळा कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पक्षाचे वरिष्ठ नेते तसेच जि.प.सदस्य व माजी जिल्हाध्यक्ष श्री.सुनील आबा पाटील वाळकी ता.चोपडा तसेच रावेर लोकसभा मतदारसंघांचे जिल्हाध्यक्ष रमाकांत बोरसे रावेर लोकसभा जिल्हाउपाध्यक्ष रावसाहेब पाटील वेले ता.चोपडा,उपस्थित होते.
मालेगाव जिल्ह्यातुन शेख सलिम शेख नबी,शेख सलिम शेख शहरीफ, फिरोज बेग मुसा बेग, अन्सारी शरिईल अब रशिद उपस्थित होते तसेच
जळगाव जिल्ह्यातुन चंद्रजित चव्हाण, विलास सपकाळे, अरुण येवले, काशिनाथ बोरसे, राजेंद्र भोई, शांताराम कनखरे, संजय बाविस्कर,अंबादास पाटील, सोपान खोंडे,चेतन सारसर चंद्रकांत चव्हाण इतर पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी प्रवेश केला.
या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट असंघटित कामगार विभाग मालेगाव शहर जिल्हाध्यक्ष पदी .शेख सलिम शेख नबी यांची नियुक्ती उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष पी.एस.पाटील व प्रमुख पाहुणे सुनील आबा पाटील यांनी केली.
तसेच जळगाव तालुका ग्रामीण विभाचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अजित पवार गट असंघटित कामगार विभाग जळगाव तालुकाध्यक्ष पदी चंद्रजित जयवंत चव्हाण कानळदा यांची नियुक्ती जळगाव लोकसभा मतदारसंघाचे जिल्हाध्यक्ष ॲड प्रदीप पाटील यांनी केली यावेळी असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.