जळगावमहानगरशैक्षणिक

५००० विद्यार्थी एकत्र गाणार “वंदे मातरम”; शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचा अभिनव उपक्रम…!

| लोकमाध्यम न्युज जळगाव | दि. ६ नोव्हेंबर : बंकिमचंद्र चॅटर्जी लिखित ऐतिहासिक “वंदे मातरम” या गीताच्या रचनेस १५० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने जळगाव शहरातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) यांच्या वतीने एक भव्य सामूहिक वंदे मातरम गायन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम शुक्रवार, दिनांक ७ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ९.३० वाजता जळगाव येथील पोलीस कवायत मैदान (नवीन बस स्थानकासमोर) येथे पार पडणार आहे.

या कार्यक्रमात शहरातील विविध शाळा आणि महाविद्यालयांतील सुमारे ५,००० विद्यार्थी “वंदे मातरम” हे गीत सामूहिकरित्या गायन करणार आहेत, अशी माहिती नितीन पाटील एनएसएस समन्वयक,आयटीआय जळगाव . यांनी दिली.

“वंदे मातरम” या गीताने भारतीय स्वातंत्र्यलढ्याला नवी प्रेरणा दिली होती. त्याच प्रेरणेतून हा विशेष उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम कवयित्री बहिणाबाई चौधरी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जळगाव आणि राणी लक्ष्मीबाई शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (मुलींची), जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला आहे.

कार्यक्रमाची सुरुवात आकर्षक पथनाट्याने होणार असून, प्रमुख वक्ते म्हणून अशोक कैलास पाटील उपस्थित राहून “वंदे मातरम” या गीताचे ऐतिहासिक व राष्ट्रीय महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून देणार आहेत.

या उपक्रमात जळगाव शहरातील सर्व शैक्षणिक संस्था, तंत्रशिक्षण संस्था तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचा उत्स्फूर्त सहभाग राहणार आहे. तसेच एनएसएस आणि एनसीसीचे स्वयंसेवक या कार्यक्रमात सक्रिय सहभाग नोंदवणार आहेत.

या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी दिनांक ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी तहसीलदार, जळगाव यांच्या अध्यक्षतेखाली कवयित्री बहिणाबाई चौधरी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जळगाव येथे बैठक घेऊन तालुकास्तरीय समिती स्थापन करण्यात आली.

समितीचे अध्यक्ष म्हणून तहसीलदार जळगाव, तर सदस्य म्हणून गटविकास अधिकारी रफिक तडवी,सहाय्यक आयुक्त (कौशल्य विकास) . संदीप गायकवाड,गटशिक्षणाधिकारी अजित तडवी,जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी एन. व्ही. चव्हाण,महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळाचे प्रतिनिधी . पी. आर. पाटील,शिक्षण संस्था प्रतिनिधी मृणालिनी कुलकर्णी,संत प्रतिनिधी ज्ञानेश्वर महाराज जवळेकर,क्रीडापटू प्रदीप तळवलकर ,साहित्यिक दीपक मधुकर तांबोळी,पत्रकार डॉ.पंकज पाटील,गड किल्ले संवर्धन समितीचे रविंद्र तुकाराम पाटील,उद्योजक नितीन रमेश नेरकर,महिला बचत गट प्रमुख वैशाली चंद्रभान महाजन,स्वयंसेवी संस्था प्रतिनिधी पवन विजय एलपुरे,राजेंद्र भगवान कानडे व अन्य सदस्यांचा समावेश आहे.

सचिव म्हणून प्राचार्य वाय. के. कुलकर्णी, उपप्राचार्य नितीन चौधरी, व गटनिर्देशक एल. पी. धांडे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे.

शहरातील सर्व नागरिक, विद्यार्थी, पालक आणि मान्यवरांनी उपस्थित राहून या ऐतिहासिक आणि प्रेरणादायी उपक्रमाला साक्षी राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button