‘गंधार’तर्फे मराठी चित्रपट गीतगायन स्पर्धा उत्साहात
समिधा रेगे व आराध्य खैरनार यांनी पटकावला राजाराम देशमुख करंडक
लोकमाध्यम न्युज | जळगांव ३१ डिसेंबर २०२४ |
पुढचं पाऊल’, ‘श्यामची आई’, ‘उंबरठा’, ‘वजीर’, ‘पिंजरा’, ‘आई शपथ’ अशा नव्या-जुन्या मराठी चित्रपटातील गाण्यांनी स्व.राजाराम देशमुख करंडक स्पर्धा उत्साहात पार पडली. मोठ्या गटात समिधा रेगे, तर लहान गटात आराध्य खैरनार यांनी स्व. राजाराम देशमुख करंडक पटकावला. येथील गंधार कला मंडळातर्फे रविवारी ही स्पर्धा झाली.
सुरुवातीला दीप प्रज्वलन डॉ. सचिन देशपांडे, परीक्षक पवन अडावदकर धुळे, मिलिंद देशमुख, विशाखा देशमुख, सुचेता नेवे यांच्या हस्ते करण्यात आले.
त्यानंतर पुणे, कोपरगाव, पाचोरा, अमळनेर, जामनेर अशा विविध ठिकाणांहून आलेल्या शालेय व खुल्या गटातून 70 स्पर्धकांनी भाग घेऊन विविध गीते गावून रंगत आणली.
सायंकाळी जळगाव आकाशवाणी केंद्राच्या ज्येष्ठ उद्घोषिका डॉ.उषा शर्मा, विलास देशमुख, अशोक जोशी आणि परीक्षकांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
विजेते असे-
मोठ्या गटात समिधा रेगे, तर लहान गटात आराध्य खैरनार यांना स्व. राजाराम देशमुख करंडक मिळाला. मोठ्या गटात द्वितीय विकास चव्हाण आणि समीक्षा नाकोडे यांना विभागून, तृतीय रेणुका कुलकर्णी व नाजनीन शेख यांना विभागून, उत्तेजनार्थ बक्षीस अनिलकुमार डेरेकर, प्रोत्साहनपर बक्षीस विजय जोशी व ज्ञानेश्वर पाथरवट यांना देण्यात आले.
लहान गटात द्वितीय काव्या पवार, तृतीय श्रावणी देशपांडे, तर उत्तेजनार्थ बक्षीस मित साळवे यांना देण्यात आले.
सूत्रसंचालन सई म्हाळस तर आभार सायली महाजन हिने मानले. यशस्वीतेसाठी विजय महाजन, उदय खेडकर, संजय जोशी वसुधा राजहंस, आसावरी जोशी, सिद्धार्थ फडणीस यांनी सहकार्य केले.