जळगावअपघात

उड्डाणपुलावर ब्रेक फेल झाल्याने रिव्हर्स येणाऱ्या ट्रकने ३ रिक्षा व ४ दुचाकींना चिरडले

| लोकमाध्यम न्यूज | जळगांव २२ मार्च २०२५ |

जळगाव रेल्वे मालधक्क्यावरुन सिमेंटचे लोड करुन छञपती शिवाजी नगर उड्डाणपुलावरुन जात असलेल्या ट्रकचे अचानक ब्रेक फेल झाले. त्यामुळे ट्रकचालकाचे ट्रकवरिल नियंत्रण सुटले आणि हा ट्रक उतारावरुन रिर्व्हस येत उड्डाणपुला शेजारी उभ्या असलेल्या तीन रिक्षांसह चार ते पाच दुचाकींना चिरडले. यामध्ये चार जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. ही घटना शनिवार दि. २२ रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास छञपती शिवाजीनगर उड्डाणपुलाजवळ घडली.

सुरत रेल्वेगेटजवळ असलेल्या मालधक्क्यावरुन सिमेंट लोड करुन (एमएच १९, सीवाय ७७४५) क्रमांकाचा ट्रक शिवाजी नगरच्या उड्डाणपुलावरुन जात होता. उड्डाणपुलावरील काही अंतर कापल्यानंतर अचानक ट्रकचे ब्रेक फेल झाले. त्यामुळे ट्रक हा उतारावरुन मागच्या बाजूने रिर्व्हस येवू लागला. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या तीन रिक्षांसह चार ते पाच दुचाकींना चिरडत वडाच्या झाडावर जावून आदळून तो थांबला.

शहरातील राधाकृष्ण नगरात राहाणरे सुरेश ओस्वाल (वय ५०) यांना रिर्व्हस येणाऱ्या ट्रकने धडक दिली, यामध्ये ओस्वाल यांच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याने ते जखमी झाले. तसेच उड्डाणपुलाशेजारी उभे असलेले रुपेश गोपाल चौधरी (वय ४३, रा. वरणगाव, ता. भुसावळ), आशा बानो यांच्यास अन्य दोघे जखमी असून त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

यावेळी परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.या अपघातात नुकसान ग्रस्त झालेल्या रिक्षा चालकांसह दुचाकीस्वारांनी ट्रकच्या मालकाने नुकसानग्रस्तांना भरपाई द्यावी. या मागणीसाठी त्यांनी अपघातस्थळी ठिय्या मांडला होता.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button