लोकमाध्यम न्युज | जळगाव १६ ऑक्टोबर २०२४ |
जळगाव शहर मतदार संघात ४ लाखावर मतदार संख्या असून, निवडणूक आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. या कालावधीत ज्या बसेस आणि रिक्षा चालकांनी राजकीय बॅनर वापरू नये अथा कोणाचा फोटो लावू नये. अशा सूचना त्यांना देण्यात आल्या आहेत. अन्यथा त्यांच्या विरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा उपविभागायी अधिकारी विनय गोसावी यांनी पत्रकार परिषदेत दिला.
यावेळी सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार शीतल राजपूत उपस्थित होत्या पत्रकारांशी बोलताना गोसावी म्हणाले की, जळगाव मतदारसंघाच्या निवडणूक प्रक्रियेबाबत सर्व राजकीय पक्षांना पदाधिकारी व कार्यकर्त्यांना माहिती देण्यात आली असून, निवडणुक प्रक्रियेची जय्यत तयारी पूर्ण झाली आहे. प्रत्येक उमेदवाराला उमेदरवारी अर्ज दाखल करणेबाबत माहिती देण्यात आली आहे. तसेच तहसीलकार्यालयात विविध कक्ष स्थापन करण्यात आले असून, त्यात नाव निर्देशन पत्राचे वाटप, माघारीची मुदत, छाननी, सूचक, अनुमोदक, शपथ आदी प्रक्रिया बाबत माहिती देण्यात येणार आहे.
तसेच दिव्यांग बांधव आणि ८५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी खास सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींना बसण्याकरीता खास सोय करण्यात आली आहे.
प्रत्येक उमेदवारास ४० लाख रुपये खर्चाची मर्यादा असून, उमेदवाराने दैनदिन हिशोब सादर करणे बंधनकारक आहे. तसेच विना परवानगीने कुणीही खाजगी किंवा सार्वजनिक मालमत्तांचे विद्रुपीकरण करू नये. अशा सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच शहरात काही रिक्षा चालक उमेदवार अथवा काही पक्षाचे राजकीय बॅनर लावून फिरतात ते त्वरीत काढण्याबाबत शहर वाहतूक शाखेला कळविण्यात आले आहे. अन्यथा अशा रिक्षाचालकाविरुद्ध कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.