सुरज नारखेडे यांची माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या जळगाव जिल्हा जनसंपर्क प्रमुख पदी निवड

| लोकमाध्यम न्यूज | जळगांव ७ फेब्रुवारी २०२५ |
माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत मानवाधिकार परिषद अध्यक्ष महाराष्ट्र राज्य सुरज विजय नारखेडे यांची माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशन महासंघ महाराष्ट्र राज्य यांच्या कडून सर्वानुमते जळगाव जिल्हा जनसंपर्क संपर्कप्रमुख पदी निवड करण्यात आली.
सुरज विजय नारखेडे यांची माहितीअधिकार कायदा महासंघ फेडरेशन महाराष्ट्र च्या ४/२/२०२५ रोजीच्या बैठकीत सर्वानुमते जळगाव जिल्हा जनसंपर्क प्रमुख पदी निवड करण्यात आली आहे. या निवडी ने जळगाव जिल्ह्यातील माहिती अधिकार कायदा महासंघ माहिती अधिकार २००५ च्या अन्नव्य होणाऱ्या अनेक अडचणी किंवा त्यासंदर्भात माहिती लपविणे किंवा शासकीय कामात दिरंगाई करणे व सामान्य नागरिकांना होणाऱ्या अनेक शासकीय कार्यातील अडचणी सोडविण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील नागरिकांना याबाबत मदत होईल ,माहिती अधिकार अधिनियमाप्रमाणे पालन करून सर्वसामान्य नागरिकांना येणाऱ्या शासकीय ,निमशासकीय ,व विविध क्षेत्रातील अनेक अडचणींपासून वाचण्यासाठी त्यांच्या न्याय हक्का साठी हि निवड करण्यात आली असे यावेळी महासंघाने सांगितले याबाबतीत हि निवड झाल्याने जळगाव जिल्हयात अनेक वंचित घटकांना न्याय मिळेल अशी अशा नारखेडे यांच्याकडून व्यक्त करण्यात आली.






