जळगांव जिल्हाविधानसभा निवडणूक

जळगाव ग्रामीण मतदारसंघात फक्त दोन नंबरवाल्यांचा विकास…! – माजी मंत्री गुलाबराव देवकरांनी डागली तोफ

लोकमाध्यम न्युज | जळगांव १२ नोव्हेंबर २०२४ |

जळगाव : विधानसभेच्या जळगाव ग्रामीण मतदारसंघात विकास हाच आमचा धर्म असल्याची जाहिरात महायुतीच्या उमेदवाराकडून सध्या केली जात आहे. मात्र, त्यांनी गेल्या काही वर्षात फक्त दोन नंबरवाल्यांचा विकास केला आहे, अशी टीका माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी केली. ग्रामीण भागातील रस्ते तीनवेळा तयार करूनही त्यावरील खड्डे कायम आहेत. मग कोट्यवधींचा निधी गेला तरी कुठे, असा सवाल देखील माजी मंत्री देवकर यांनी उपस्थित केला.

जळगाव ग्रामीण मतदारसंघातील धरणगाव येथे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी राष्ट्रवादीचे उमेदवार माजी मंत्री श्री.देवकर यांनी महायुतीचे प्रतिस्पर्धी उमेदवार मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर तोफ डागली. विकासाची कोणतीही दृष्टी नसलेल्या नेतृत्वामुळे जळगाव ग्रामीण मतदारसंघ पिछाडीवर पडला आहे. स्वतःला पाणीवाला बाबा म्हणणाऱ्यांनी धरणगावकरांचे पाण्यासाठी हाल केले आहेत. करोडो रूपये खर्चुनही आज धरणगावात १५ दिवसाआड अशुद्ध पाणीपुरवठा होत आहे. नशिराबाद, असोदा, ममुराबाद, शिरसोली येथेही तीच परिस्थिती आहे. मी पाणीपुरवठा मंत्री असतो तर धरणगावला दररोज पाणी दिले असले, असे माजी मंत्री गुलाबराव देवकर म्हणाले.

मंत्र्याचे ठोस काम दाखवा १ लाख रूपये देईन

मंत्री गुलाबराव पाटील हे जळगाव ग्रामीणच्या विकासाचा दावा करतात. त्यांनी १० वर्षात काय केले, ते समोर येऊन सांगावे. त्यापेक्षा एक ठोस काम दाखवून द्यावे, मी त्यांना १ लाख रूपये देण्यास तयार आहे. मात्र, ते कधीच ठोस काम दाखवू शकणार नाहीत. अडीच वर्षांसाठी मंत्रीपदाची संधी मिळाली, तेव्हा मी धरणगावच्या रेल्वे उड्डाणपुलाचे काम केले. बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे व बहिणाबाई चौधरी यांच्या स्मारकाच्या कामाला चालना दिली. म्हसावदला रेल्वे उड्डाणपुलाचे काम सुरू केले. धरणगावात आणि पालकमंत्र्यांच्या पाळधी गावात बसस्थानक उभारले. केळीचा पिकविमा योजनेत समावेश केला. २१० साठवण बंधारे बांधून पावसाचे पाणी अडविण्यासाठी प्रयत्न केले, असे देखील माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी नमूद केले.
———————–
जळगाव ग्रामीणच्या विकासासाठी गुलाबराव देवकरांना विजयी करा : शरद पवार

जळगाव आणि धरणगाव तालुक्यांचा सर्वांगिण विकास करण्यासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार गुलाबराव देवकर यांना बहुमताने विजयी करा. जळगाव ग्रामीणला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी, शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस पक्षाची महाविकास आघाडी कटिबद्ध आहे. महिलांना महालक्ष्मी योजनेच्या माध्यमातून दरमहा ३ हजार रूपये देण्यात येतील. याशिवाय शेतकऱ्यांना ३ लाखांची कर्जमाफी दिली जाईल. बेरोजगार तरुणांना ४ हजार रूपये भत्ता मिळेल. जातीनिहाय जनगणना करून आरक्षणाची मर्यादा वाढविण्यात येईल, असे आश्वासन शरद पवार यांनी धरणगाव येथील सभेच्या ठिकाणी दिले.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button