लोकमाध्यम न्युज | जळगांव १२ जानेवारी २०२५ |
संपूर्ण देशभरातील समस्त शिंपी समाजातील बांधवांना एकत्र आणून त्यांच्या समस्या व अडचणी सोडविण्यासाठी महाराष्ट्र राज्य अन्य आयोगाचे अध्यक्ष व अ.भा.संत नामदेव क्षत्रिय महासंघाचे मा अध्यक्ष अॅड. महेश ढवळे यांच्या नेतृत्वाखाली अ.भा. संत नामदेव क्षत्रिय एकसंघाची स्थापना मुंबई येथे करण्यात आली असल्याची माहिती संत नामदेव शिंपी समाज पंढरपूर यांनी दिली.
मुंबई येथे अॅड. महेश ढवळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. याप्रसंगी संत नामदेव महाराजांचे वंशज ह.भ.प. माधव महाराज नामदास, ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज नामदास, ह.भ.प. निवृत्ती महाराज नामदास, संत नामदेव क्षत्रिय महासंघाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नानासाहेब पाथरकर, अॅड.अजय तल्हार, संभाजीनगर केशवराज संस्थेचे अध्यक्ष रुपेश खांडके, सचिव धनंजय जवंजाळ, प्रदीप कळसकर नंदकुमार कोसतवार नांदेड,मनोज भांडारकर जळगाव, सुशील बोबडे , नितीन बाविस्कर शिरपूर, गजेंद्र शिंपी नंदुरबार, अशोक खैरनार मुंबई, रुपेश बागुल मालेगाव, राकेश वाजवणे कोल्हापूर संजय परदेशी पंढरपूर शिंपी समाजाचे अध्यक्ष गणेश उंडाळे यांच्यासह राज्यभरातून शिंपी समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते.
समस्त शिंपी समाजाच्या एकत्रीकरणासाठी अ.भा. संत नामदेव क्षत्रिय एकसंघाची स्थापना संपूर्ण महाराष्ट्रातील शिंपी समाजातील सर्व पोट जातींना एका छताखाली, एका मंचावर आणण्यासाठी करण्यात आली आहे. अॅड. महेश ढवळे यांनी समाजाच्या एकत्रीकरणासाठी गेल्या दोन वर्षापासून अथक परिश्रम सुरु केले आहेत. त्यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळेच राज्यातील शिंपी सामाज बांधवांसाठी संत नामदेव आर्थिक विकास महामंडळाची घोषणा राज्य सरकारने केली असून या माध्यमातून समाज बांधवांना आर्थिक लाभ घेता येणार आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील नामदेव, अहिर, वैष्णव, माहेश्वरी, भावसार, मेरू, तेलगू, व संपूर्ण देशभरातील दिल्ली, हिमाचल प्रदेश राजस्थान ,गुजरात, पंजाब ,हरियाणा, बिहार उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मध्य प्रदेश ,छत्तीसगड ओरिसा, पश्चिम बंगाल आसाम, कर्नाटका तेलंगणा व तमिळनाडू या राज्यातील सर्व पोटजातीतील समाज बांधवांना एकाच छत्रछायेखाली व एका व्यासपीठावर आणण्याचा संकल्प करण्यात आला. तसेच यावेळी शिंपी समाजातील प्रलंबित विषयांवर चर्चा करण्यात आली. यामध्ये १)पंढरपुरातील संत नामदेव मंदिराचा जिर्णोध्दार करणे, २)राज्य शासनाच्यावतीने उभारण्यात येणार्या संत नामदेव महाराजांच्या स्मारकाचे काम लवकर सुरु करणे ३) जुलै महिन्यात संत नामदेव महाराजांचा 675 वा संजीवन समाधी सोहळा मोठ्या प्रमाणात साजरा करण्याबाबत चर्चा करण्यात आली. संपूर्ण देशभरातील समाज बांधवांना एका बॅनरखाली आणण्यासाठी अ.भा. संत नामदेव क्षत्रिय एकसंघ या माध्यमातून पुढील काळात जोमाने कार्य करेल असा आशावाद ह.भ.प. नामदास महाराज यांनी व्यक्त केला.