जळगांव जिल्हागुन्हे

पोलिसांची कुंटणखान्यावर धाड :५० महिलांची सुटका

चोपडा पोलिसांची कारवाई : ११ महिला आरोपींना अटक

जळगांव दि.२१ : चोपडा शहरातील नगरपरिषदेच्या मागे असलेल्या एका पत्र्याच्या शेडमध्ये देहविक्री करणाऱ्या व्यवसायिकांवर चोपडा शहर पोलिसांनी छापा टाकून तब्बल ५० पीडित महिलांची सुटका करण्यात आली, यात एकूण ११ जणांविरोधात चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी गुरुवारी २१ मार्च रोजी  पत्रकार परिषदेत दिली.

चोपडा शहरातील नगरपरिषदेच्या मागे असलेल्या वार्ड क्रमांक ३४ मध्ये बेकायदेशीररित्या पत्राच्या शेडमध्ये देहविक्रीचे व्यवसाय करून कुंटणखाना चालवीत असल्याबाबतची माहिती पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकासह बुधवारी २० मार्च रोजी सायंकाळी ७३० वाजेच्या सुमारास बनावट ग्राहक तयार करून देहविक्रीच्या ठिकाणी पाठविला. दरम्यान कुंटणखाना चालवीत असल्याबाबत खात्रीलायक माहिती मिळाल्यानंतर त्यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली चोपडा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्यासह पथकाने छापा टाकला. यामध्ये ११ महिला आरोपींना पोलिसांनी अटक केली तर तब्बल ५० पिडीत महिलांची सुटका करण्यात आली. या प्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात ११ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिडीत महिलांना जळगाव येथील आशादीप महिला सुधारगृह येथे स्थलांतरित करण्यात आले आहे.

यांनी केली कारवाई
जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली चोपडा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे, चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर, सपोनि प्रशांत खंडारे, पोलीस निरीक्षक एकनाथ भिसे, पोउनि अनिल भुसारे, योगेश्वर हिरे, स.फौ. जितेंद्र सोनवणे, पोहेकॉ विलेज सोनवणे, पोहेकॉ दीपक विसावे, हरिश्चंद्र पवार, शेषराव तोरे, संतोष पारधी, ज्ञानेश्वर जवागे, महेंद्र साळुंखे, सुभाष सपकाळ, संदीप भोई, महिला पोहेकॉ विद्या इंगळे, शुभांगी लांडगे, रत्नमाला शिरसाट, पोकॉ रवींद्र पाटील, लव सोनवणे, प्रकाश मथुरे, प्रमोद पवार, रवींद्र बोरसे, मदन पावरा, विजय बच्छाव, मपोकॉ अनिता हटकर यांनीही कारवाई केली आहे.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button