
| लोकमाध्यम न्यूज | जळगांव २२ जानेवारी २०२५ |
जळगाव शहरातील कामगार चळवळीला बळकट करणारे कामगार नेते स्व. अण्णासाहेब दिलीपराव पंडितराव कोल्हे आणि त्यांचे बंधू कामगार नेते स्व. बापूसाहेब विजयराव पंडितराव कोल्हे हे शहरातील कामगारांचे प्रेरणास्थान आहेत. कामगारांच्या न्याय हक्क व अधिकारांसाठी हयातभर संघर्ष करणाऱ्या स्व. अण्णासाहेब दिलीपराव पंडितराव कोल्हे व स्व. बापूसाहेब विजय पंडितराव कोल्हे यांनी शहराच्या औद्योगिकीकरणात मोलाचे योगदान देणाऱ्या कामगारांना लढण्याची व स्वाभिमानाने जगण्याची सातत्याने ऊर्जा दिली आहे. जगविख्यात रेमंड कंपनीच्या कामगारांसाठी कोल्हे बंधूंनी त्यांच्या हयातीत नेहमीच लढा देऊन न्याय मिळवून दिला आहे. स्व.अण्णासाहेब दिलीपराव पंडित कोल्हे व स्वर्गीय बापूसाहेब विजय पंडितराव कोल्हे यांचा कामगारांसाठी समर्पित जीवनाचा संघर्षशील इतिहास कामगारांना सातत्याने प्रेरणा देत असतो.
स्व. अण्णासाहेब दिलीपराव पंडितराव कोल्हे यांचे औद्योगिक वसाहत परिसरातील जळगाव संभाजीनगर मार्गावरील रेमंड चौफुली या ठिकाणी पूर्णाकृती/अर्धाकृती पुतळा बसविला जावा.
तसेच औद्योगिक वसाहत मधील गोदावरी इंजिनिअरिंग कॉलेज- विनुज वर्ल्ड- बीपीसीएल- डोर मार्केट- अशोक इंडिया कंपनी रोड- रेमंड चौफुली- भगवान दाल मिल- गोपाळ पालीमर्स- नेक्सा शोरूम (आर एल चौफुली) – कल्प इम्पेक्स- स्ट्रीमफ्लो पॉलीवेअवे प्रायव्हेट लिमिटेड ते बीपीसीएल पर्यंत गोदावरी इंजिनिअरिंग कॉलेज या मार्गाला स्वर्गीय बापूसाहेब विजय पंडितराव कोल्हे यांचे नाव देण्यात यावे.
कामगारांचे प्रेरणास्थान असणाऱ्या दोन्ही कोल्हे बंधूंच्या कार्याचे स्मरण कामगारांना सातत्याने होईल व त्यातून कामगारांना स्वाभिमानाने जगण्याची ऊर्जा मिळेल. यासाठी महानगरपालिकेने तातडीने जागा उपलब्ध करून योग्य ती कार्यवाही करून निर्णय घ्यावा अशी समस्त कामगार व जळगाव शहरवासीयांतर्फे विनंती मागणी करीत आहोत. अशा आशयाचे जळगाव शहर महानगरपालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांना निवेदन देण्यात आले.याप्रसंगी मुविकोराज मुरलीधर कोल्हे, भूषण भोळे, अमेय राणे, राहुल पाटील, तुषार चौधरी, रुपेश ठाकूर, यशवंत पाटील,आदी उपस्थित होते.





