जळगांव जिल्हाअध्यात्मिक

“ध्येयावर निष्ठा ठेवा, संयम पाळा आणि यशस्वी व्हा”- ह.भ.प. रविकिरण महाराजांचा पाळधीतील कीर्तनातून मंत्र

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अभिष्टचिंतन निमित्ताने पाळधी येथे अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताहाचे आयोजन

लोकमाध्यम न्युज जळगांव (पाळधी /धरणगाव/) दि. २९ : “ध्येयावर लक्ष केंद्रित ठेवा, संयम आणि शांतता अंगीकारा, विघ्नसंतोषी लोकांकडे दुर्लक्ष करा आणि यशस्वी व्हा…” हा त्रिसूत्री मंत्र पाळधी येथे आयोजित कीर्तनात खान्देश भूषण ह.भ.प. रविकिरण महाराज दोंडाईचेकर यांनी दिला. त्यांनी तरुणांना उदात्त जीवनाचे मार्गदर्शन करत आदर्श विचारांची पेरणी केली.

पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या अभिष्टचिंतन निमित्ताने पाळधी येथे सुरू असलेल्या अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताहाच्या पहिल्या दिवशी रविकिरण महाराजांचे कीर्तन आयोजित करण्यात आले होते. संकीर्तन सप्ताहाचे हे सलग तिसरे वर्ष आहे.

*कीर्तनात महाराज म्हणाले की, *आवडे देवासी तो एक प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिन.*
*तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा !!*
*आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आन नाही॥*
या अभंगाचे निरूपण करत महाराजांनी अध्यात्म, समाज प्रबोधन आणि मनोरंजनाचा त्रिवेणी संगम भाविक भक्तांसमोर साकारला.

ते पुढे म्हणाले, “जीवनात खूप अडथळे येतात, पण आपण दिव्याच्या प्रकाशासारखे सतत प्रज्वलित राहिले पाहिजे. आपल्या आईवडिलांची सेवा करा, गुरूंचा सन्मान करा. व्यसनांपासून दूर राहा. आणि वयोवृद्धांशी सन्मानाने वागा.”

*आपल्या खास अहिराणी भाषेतील विनोदी शैलीत, उपमा, दृष्टांत आणि गोष्टी सांगत त्यांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. हास्याचे फवारे उडाले, पण त्यामागे खोल अध्यात्मिक अर्थ दडलेला होता.*

कीर्तनाच्या समारोपप्रसंगी गावातील विविध मंडळांकडून ह.भ.प. रविकिरण महाराज यांचा सन्मान करण्यात आला. लहानग्या बाल टाळकरींचा सहभाग विशेष आकर्षण ठरला.

महाराजांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे कौतुक करीत म्हणले की, गुलाबराव पाटील हे मंत्री असूनही भक्तीमार्गाला अग्रक्रम देतात . त्यांच्या सुपुत्र प्रतापराव व विक्रम पाटील यांचे तसेच तरुण सहकाऱ्यांचेही त्यांनी मन:पूर्वक अभिनंदन केले.

या कीर्तनाच्या माध्यमातून पाळधी गावाने भक्ती, प्रबोधन आणि संस्कृती यांचे एकत्रित दर्शन घडवले.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button