
| लोकमाध्यम न्यूज | जळगांव २२ मार्च २०२५ |
जागतिक जल दिनाचे औचित्य साधून मेहरुण येथील श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी शनिवारी पाणी बचतीची शपथ घेतली. शाळेच्या आवारात पाणी बचतीचा संदेश देणारे घोषवाक्य हातात घेऊन ‘पाणी हेच जीवन’, ‘पाण्याची बचत म्हणजेच पाण्याची निर्मिती’, ‘जल है तो जीवन है’ अशा घोषणा विद्यार्थ्यांनी दिल्या.
शाळेचे मुख्याध्यापक मुकेश नाईक यांचे मार्गदर्शन लाभले. आयोजन व संकल्पना संस्थेचे अध्यक्ष प्रशांत नाईक यांची होती. त्यांनी पाणी हे जीवन आहे, हे सर्व आपण ऐकत आलो आहोत, म्हणत आलो आहोत, पण यावर कोण विश्वास ठेवणार? पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवणे ही आजच्या काळाची गरज आहे, आज जर आपण पाणी वाचवले नाही. तर आपल्या येणार्या पिढीला त्याच्या प्रत्येक थेंबासाठी तळमळ करावी लागेल, विद्यार्थ्यांना अशी अनमोल माहिती दिली. या उपक्रमात शाळेच्या उपशिक्षिका सुवर्णा अंभोरे यांनी मुलांना पाणी बचतीची शपथ दिली . शाळेतील सर्व शिक्षक, विद्यार्थी पालकांसह शाळेतील सर्व कर्मचारी सहभागी झाले होते.





