जळगावधार्मिक

श्रीराम मंदिर संस्थानात श्रीरामनवमी महोत्सव

३० मार्च ते ७ एप्रिल २०२५ पर्यंत आयोजन

| लोकमाध्यम न्यूज | जळगांव ३१ मार्च जळगांव नगरीचे ग्रामदैवत श्रीराम मंदिर संस्थानात श्रीरामनवमी महोत्सवानिमित्त श्रीरामभक्तीपर प्रवचन मालाचे आयोजन दि. ३० मार्च ते ७ एप्रिल २०२५ अखेर करण्यात आल्याची माहिती संस्थानचे गादीपती ह.भ.प. मंगेशमहाराज जोशी यांनी दिली.

श्रीराम नवमी महोत्सवात दररोज प्रातः काकडा भजन, आरती, प्रभू श्रीरामचंद्रांचा होईल. पंचामृत अभिषेक, पोशाख, तुलसी अर्चन, श्रीविष्णुसहस्रनाम, आरती, स. ८ १२ श्रीअध्यात्म रामायणाचे पारायण, दुपारी नैवेद्य, दु. ४ ते ६ जळगावातील विविध महिला मंडळाची भजन सेवा ,सायं. ६ वा. हरिपाठ, श्रीरामरक्षा स्तोत्र व त्रयोदशाक्षरी महामंत्र जप, ७ वा. धुपारती, ७:३० वा. प्रवचन सेवा, रात्री ८ वा. श्रीमहाराजांचे परंपरेचे भजन
महोत्सवात दररोज सायं. ७:३० वा. श्री. मुकुंदकाका धर्माधिकारी गुरुजी यांचे रसाळ व ओघवत्या वाणीतून प्रवचने होतील. दि. ३० मार्च ते ६ एप्रिल अखेर अध्यात्म रामायणाचे पारायण श्री. मकरंद देशमुख गुरुजी करतील.
दि. ३ एप्रिलला स. ८ वा. प्रभू श्रीरामचंद्रांच्या उत्सवमूर्तीस १६०० पुरुषसूक्त आवर्तनाने महाभिषेक करण्यात येणार आहे.
दि. ६ एप्रिलला श्रीराम नवमीनिमित्त प्रभू श्रीरामचंद्रांचा महाभिषेक, विशेष पूजा होईल. स. १०:३० ते १२ श्रीराम जन्मोत्सवाचे गुलालाचे कीर्तन ह.भ. प. श्रीराममहाराज जोशी यांचे होईल. दु.१२ः दु.१२:३० वा. प्रभू श्रीरामचंद्रांची महाआरती होईल. संध्या. ७ वा. जळगांवातील ब्रह्मवृंदांचा वेदमंत्रघोष होईल. रात्रौ ८ वा. गीतरामायण हा कार्यक्रम संस्कार भारती जळगांवचे वतीने घेण्यात येणार आहे.
दि. ७ रोजी श्रीगुरु महाराजांचे परंपरेचे गोपाळकाल्याचे भजन होऊन महोत्सवाची सांगता होईल.
तरी पंचक्रोशीतील भाविकांनी यात सहभागी होऊन दर्शनाचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन श्रीगुरु मंगेशमहाराज जोशी यांनी केले आहे.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button