जळगावमहापालिका निवडणुक

शिवसेनेचा सलग दुसरा विजय प्रभाग ९ ‘अ’ मधून शिवसेनेचे उमेदवार मनोज सुरेश चौधरी बिनविरोध

| लोकमाध्यम न्युज जळगांव  | दि. १ जानेवारी २०२६ : जळगाव शहर महानगरपालिका निवडणुकीत नववर्षाच्या पहिल्याच दिवशी शिवसेना (शिंदे गट) ने धडाकेबाज कामगिरी करत सलग दुसरे यश संपादन केले आहे. प्रभाग ९ ‘अ’ मधून शिवसेनेचे उमेदवार मनोज सुरेश चौधरी यांचा विजय बिनविरोध निश्चित झाला असून, अपक्ष उमेदवाराने माघार घेतल्याने त्यांच्या निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे.

महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत महायुतीचे वर्चस्व वाढताना दिसत आहे. आतापर्यंत महायुतीतील तीन नगरसेवक बिनविरोध निश्चित झाले आहेत. बुधवारी सायंकाळी प्रभाग १२ ‘ब’ मधून भाजपच्या उज्ज्वलाताई बेंडाळे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली होती. त्यानंतर गुरुवारी सकाळी प्रभाग १८ ‘अ’ मधून शिवसेनेचे डॉ. गौरव चंद्रकांत सोनवणे हे अपक्ष उमेदवार चंद्रशेखर सोनवणे यांच्या माघारीमुळे बिनविरोध निवडून आले.या यशानंतर दुपारी प्रभाग ९ ‘अ’ मधील अपक्ष उमेदवार राहुल अशोक लोखंडे यांनीही आपली उमेदवारी मागे घेतल्याने मनोज सुरेश चौधरी यांचा विजय निश्चित झाला आहे. आता केवळ अधिकृत घोषणेची औपचारिकता बाकी असून, या बिनविरोध यशामुळे शिवसेना शिंदे गटाच्या गोटात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. विजयानंतर मनोज चौधरी आणि त्यांच्या समर्थकांनी महापालिका परिसरात जल्लोष साजरा करत आनंद व्यक्त केला.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button