जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या स्केटिंग क्लबच्या खेळाडूंची आंतरराष्ट्रीय स्पर्धेत निवड
हर्ष प्रफुल्ल भालेराव आराध्य परदेशी, अबू दुजाना पीरजादे यांची झाली निवड

| लोकमाध्यम न्युज जळगांव | २४ फेब्रुवारी २०२६ : जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या स्केटिंग क्लब चे खेळाडू 22 फेब्रुवारी रोजी छञपती संभाजी नगर येथे रोलर रीले स्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया आयोजित राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत सहभागी झाले होते त्यात हर्ष भालेराव आणि आराध्य परदेशी हे स्पर्धेत बेस्ट स्केटर ठरले
6 वर्षा आतील इनलाईन स्पीड आणि रिले प्रकारात आराध्य परदेशी याने दोन सुवर्ण तर अबू दुजाना पीरजादे याने एक गोल्ड आणि रजत पदक मिळविले 6 वर्षा आतील कॉड स्पीड आणि रिले प्रकारात-हर्ष भालेराव याने सुवर्ण आणि कास्य पदक मिळविले.
त्या तिघांची थायलंड येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत निवड झाली आहे त्यांचे जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ महेश्वर रेड्डी,अपर पोलीस अधिक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गनापुरे ,पोलीस उपअधीक्षक गृह अरुण आव्हाड ,वेल्फेअर पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी कौतुक केले तसेच पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या
स्केटिन प्रशिक्षक जागृती काळे-महाजन , अश्विनी निकम,उज्वला कासार,स्वप्नील निकम यांचे मार्गदर्शन लाभले.






