
| लोकमाध्यम न्यूज | जळगांव २१ मार्च २०२५ |
जुने जळगाव येथील का.ऊ.कोल्हे विद्यालय मागील दशरथ नगर येथे आज दिनांक २१ मार्च ते २७ मार्च दरम्यान रोज संध्याकाळी ७ ते १० ह्या वेळात भव्य संगीतमय श्री शिव महापुराण कथेला प्रारंभ होणार असून भव्य व्यासपीठ कथेसाठी करण्यात आले आहे.
व्यासपीठावर १४ फूट उंच शिवलिंग तयार करण्यात आले असून बिल्व वृक्षाच्या सान्निध्यात संगीतमय श्री शिव महापुराण कथा होणार आहे. ह.भ.प.देवदत्त महाराज हे कथेचे निरूपण करणार आहेत. कथा श्रावणासाठी उत्तम बैठक व्यवस्था करण्यात आली आहे, जास्तीत जास्त भाविकांनी कथा श्रावणाचा लाभ घ्यावा असे आवाहन युवा दशरथ नगर मित्र मंडळ व पवन रामदास कोळी यांनी केले आहे.