
| लोकमाध्यम न्यूज | जळगांव दि. १ : लेवा पाटीदार प्रीमिअर लीग आयोजित कवयित्री बहिणाबाई चौधरी महिला बॉक्स क्रिकेट स्पर्धा नुकत्याच पार पडल्या. यात लक्ष्मी रॉयल रेंजर्स संघ विजयी तर स्पेस ९ क्रिएटर्स संघ उपविजयी ठरला.
विजयी संघांना माजी महापौर सीमाताई भोळे, डॉ. केतकी पाटील, माधुरी अत्तरदे, डॉ. पंकज पाटील, डॉ. जितेंद्र चौधरी गायत्री राणे विपुला पाटील दिप्ती ढाके गायत्री महाजन अमिता भंगाले आदींच्या उपस्थितीत बक्षिसे वितरीत करण्यात आले.
यावेळी लक्ष्मी रॉयल रेंजर्स संघाच्या मालक पुजा सरोदे, संघाच्या कर्णधार दीपमाला काळे तसेच खेळाडू सोहम चौधरी, तिर्थक चौधरी, रुपाली भंगाळे, सायली भंगाळे, अर्चना पाटील, डॉ. श्वेता चौधरी, जयश्री चिरमाडे व वैष्णवी राणे यांनी संघाचा विजयी चषक स्विकारत विजयाचा जल्लोष केला.
या स्पर्धेत बेस्ट बॅटस् मन म्हणून तिर्थक चौधरी तर बेस्ट बॉलर म्हणून जयश्री चिरमाडे यांना गौरविण्यात आले.





