लोकमाध्यम न्युज | जळगांव ५ जानेवारी २०२५ |
आज संपूर्ण महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी महा सदस्य नोंदणी अभियानाची सुरुवात रविवारी दिनांक ५ जानेवारी सुरू झाली असून या अनुषंगाने भाजप जळगाव जिल्हा महानगर च्या वतीने जळगाव शहरातील ९ मंडळांमध्ये भाजप सदस्य नोंदणीला आज सकाळी संपूर्ण महानगरात सुरू झाली असून याची सुरुवात मंडळ क्रमांक सहा येथे केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री ना. रक्षाताई खडसे यांच्या उपस्थितीत सुरू झाली.
भाजपच्या ३६५ बुथ सुरू अंतर्गत प्रत्येक बुथ प्रमुखांना २५ प्रमाणे सदस्य नोंदणी टार्गेट दिलं असून या अनुषंगाने सायंकाळपर्यंत भाजपचे जळगाव महानगरातून ८९८७ सभासद ऑनलाईन नोंदणी झाले.
सकाळी जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे राजू मामा यांनी मंडल क्रमांक ४ येथे आपल्या बुथ वर जाऊन भाजप सदस्य नोंदणी केली या प्रसंगी मा. महापौर सीमाताई भोळे मंडल अध्यक्ष पिंटू काळे मा. नगरसेविका दीपमाला काळे तसेच भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.
तसेच मंडल क्रमांक सहा येथे सदस्य नोंदणी अभियानाचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख डॉ राधेश्याम चौधरी, जिल्हा संयोजक महेश जोशी, अमित भाटिया, व जिल्हा व मंडल पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.