शिवाजी महाराजांना हजारो जळगावकरांचे अभिवादन
डिजे,भगवे ध्वज, लेझर शो,विद्युत रोषणाईने शिवनेरी अवतरली
जळगांव दि.१९ : महाराष्ट्राचे आराध्य दैवत,बहुजन प्रतिपालक,लोक राजा, जाणता राजा,श्रीमंत योगी छ्त्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त जळगावातील हजारो नागरिकांच्या जनसागराने मध्यरात्री १२ वाजता राजांचे पूजन करून सामूहिक महाआरतीने आपल्या लाडक्या राजाचा जयघोष करीत अभिवादन केले. शिवजयंतीच्या निमित्ताने शिवतीर्थावर हजारो शिवप्रेमी युवकांनी डीजे व ढोलताशांच्या गजरात हातात भगवे ध्वज मिरवीत जय भवानी ,जय शिवाजी च्या गगनभेदी जयघोषात अभिवादन केले.युवकांचा प्रचंड उत्साह,अबाल ,वृद्ध, पुरुष,स्त्रिया, युवती यांची गर्दी जोडीला लेझर किरणांचाशो,विद्युत रोषणाई,फटाक्यांची आतषबाजी यामुळे शिव तीर्थ कोर्ट चौक येथे शिवनेरीच् अवतरल्याचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रंगीआकर्षक सजावट केलेल्या शिवतिर्थावरील सोहळा आपल्या मोबाईलमध्ये टिपण्यासाठी युवकांचा उत्साह ओसंडून वाहत होता .रात्री उशिरापर्यंत जळगांवकरांनी शिवाजी महाराजांचे दर्शन घेण्यासाठी प्रचंड संख्येने गर्दी केली होती.जळगांव पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता .