जळगावमहानगरमहाराष्ट्र

नवरात्रोत्सवाच्या शुभमुहूर्तावर जळगावात ‘हाऊस ऑफ ज्वेल्स बाय बाफनाज्’ चे भव्य उद्घाटन

सोन्याचे दागिने, डायमंड्सची विस्तृत श्रेणी सुरू करण्याचा निर्णय

|लोकमाध्यम न्युज जळगाव | दि.२१ सप्टेंबर २०२५ :शहराच्या रिंगरोडवरील ‘हाऊस ऑफ ज्वेल्स बाय बाफनाज्’ अधिक भव्य स्वरूपात ग्राहकांच्या सेवेत येत आहे. सोमवार दि. २२ सप्टेंबर रोजी नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी, घटस्थापनेच्या शुभ मुहूर्तावर या नव्या शोरूमचे उद्घाटन होत आहे. या सोहळ्यासाठी राजकारण आणि समाजकारणातील अनेक दिग्गज उपस्थित राहणार आहेत.

गेली चार वर्षे ‘हाऊस ऑफ ज्वेल्स’ म्हणून चांदीचे दागिने, पूजेचे साहित्य आणि कलाकृतींसाठी प्रसिद्ध असलेल्या बाफना परिवाराने आता ग्राहकांच्या प्रेमामुळे आणि मागणीमुळे सोन्याचे दागिने आणि डायमंड्सची विस्तृत श्रेणी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी त्यांनी आपले पूर्वीचे शोरूम (गंगाई बिल्डिंग, रिंग रोड) सोडून, त्याच्या समोरच पंचरत्न टॉवर, जेडीसीसी बँकेसमोर, रिंग रोड येथे स्वतःचे नवे आणि प्रशस्त शोरूम सुरू केले आहे. सोमवार दि. २२ सप्टेंबर ते बुधवार दि. २ ऑक्टोबर (विजयादशमी) या कालावधीत ‘विशेष उद्घाटन महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. या उद्घाटन सोहळ्याला अनेक राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत:

यात माजी मंत्री सुरेशदादा जैन, माजी खा. ईश्वरबाबूजी ललवाणी, उद्योजक अशोकभाऊ व ज्योती जैन, नयनताराजी बाफना, खा. स्मिताताई वाघ, पद्मश्री ॲड. खा. उज्ज्वल निकम, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, आ. राजूमामा भोळे, भागवतजी भंगाळे, भरतदादा अमळकर, गोसेवक अजय ललवाणी, ॲड. नारायण लाठी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या निमित्ताने बाफना परिवाराने सोन्या-चांदीसोबत हिरे, पोल्की, जडाऊ, प्लॅटिनम आणि राशीरत्नांचे आकर्षक दागिने एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिले आहेत. ग्राहकांनी या विशेष महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सुनील कस्तूरचंदजी बाफना, अभिषेक सुनीलजी बाफना आणि ऋषभ सुनीलजी बाफना यांनी केले आहे.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button