जळगाव दि.२३ : खान्देशातील एकमेव सर्वात मोठ्या म्हणून ख्यात असलेल्या शिरसोली रोडवरील झुलेलाल वॉटर पार्क व रिसॉर्टचा तिसरा सिझन लवकरच सुरू होत आहे. यात भव्य होळी उत्सवाचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये धमाल मस्तीसह आपला पारंपरीक महोत्सव साजरा करण्याची संधी उपलब्ध करण्यात आलेली आहे.शिरसोली रोडवरील अनुभूती स्कूलच्या मागील बाजूस असलेल्या पाचदेवी माता मंदिराच्या निसर्गरम्य परिसरात झुलेलाल वॉटर पार्क व रिसॉर्टमध्ये यंदा तिसरे पर्व हे २४ मार्च रोजी मोठ्या उत्साहात सुरू होत आहे. आधीच्या दोन वर्षांमध्ये खान्देशातील आबालवृध्दांचा येथे प्रचंड प्रतिसाद लाभला असून यंदा तर अजून बर्याच नव्या सुविधा उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. यात प्रामुख्याने सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असणारा वेव्ह पुल तयार करण्यात येत असून याच्या सोबतीलाच गेम झोन देखील लोकांच्या सेवेत उपलब्ध होणार आहे.
गायिका प्रिया आणि डिजे साक्षी
दरम्यान, यंदा होळीनिमित्त येथे गेल्या वर्षीप्रमाणेच दिनांक २५ मार्च रोजी ‘होली धमाका-होली फुलोवाली’ या स्पेशल कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यात गायिका प्रिया आणि डिजे साक्षी यांच्या संगतीने दिवसभर शानदार संगीतमय कार्यक्रम होणार आहे. याचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे ढोल धमाका असून यात दिल्ली येथील ढोल पथकाच्या तालावर उपस्थितांना बहारदार नृत्य करता येणार आहे. हा कार्यक्रम फक्त फॅमिली मेंबर्ससाठी असून याचे तिकिट मूल्य प्रौढांसाठी प्रत्येकी ५९९ तर बालकांसाठी ४९९ रूपये इतके आहे. या संदर्भात बुकींगसाठी आपण ९८९०७७०८५९ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन झुलेलाल वॉटर पार्कच्या वतीने संचालक नीरज जेसवानी यांनी केले आहे.
निरज जेसवानी संचालक झुलेलाल वॉटर पार्क
झुलेलाल वॉटर पार्कमध्ये अगदी सुरक्षित वातावरणात आपल्या कुटुंबासह धमाल मस्ती करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे. लहान मुलांपासून ते तरूणांसाठी वॉटर राईडची सुविधा उपलब्ध असून भव्य जलतरण तलावही येथे आहे. याच्या सोबतीला येथे अतिशय स्वादिष्ट खाद्यपदार्थ व विविध स्नॅक्सदेखील उपलब्ध आहेत. नागरिकांनी याचा लाभ घेण्याचे संपर्क साधण्याचे आवाहन संचालक नीरज जेसवानी यांनी केले आहे.