लोकमाध्यम न्युज | जळगांव दि. १० ऑगस्ट २०२४ |
भारतीय स्वातंत्र्याला 77 वर्ष पूर्ण होत असल्याचे पार्श्वभूमीवर जळगाव शहरात “घरोघरी तिरंगा“ (हर घर तिरंगा) या उपक्रमाचे आयोजन जळगाव महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आलेले आहे. त्या अनुसरून शुक्रवार 9 ऑगस्ट रोजी तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते.
महानगरपालिका प्रशासकीय इमारतीपासून ते स्वातंत्र्य चौक, स्वातंत्र्य चौकापासून ते जळगाव शहर महानगरपालिका पर्यंत तिरंगा यात्रा काढण्यात आली.
या तिरंगा यात्रेत आयुक्त तथा प्रशासक ज्ञानेश्वर ढेरे यांनी तिरंगा ध्वज हातात घेऊन तिरंगा यात्रेला सुरुवात केली. त्यांच्या समवेत तिरंगा यात्रेत महसुलचे उपायुक्त अविनाश गांगोडे, उपआयुक्त निर्मला गायकवाड- पेखळे उपायुक्त धनश्री शिंदे, मुख्य लेखा अधिकारी चंद्रकांत वानखेडे, मुख्य लेखापरीक्षक मारुती मुळे, मनपाच्या शिक्षण मंडळाच्या प्रशासन अधिकारी दिपाली पाटील, नगर रचनाकार अमोल पाटील, सहायक आयुक्त अभिजीत बाविस्कर, सहायक आयुक्त गणेश चाटे, सहायक आयुक्त उदय पाटील, प्रभाग समिती क्रमांक एक ते चार चे प्रभाग अधिकारी सुनील गोराणे, मनोज शर्मा, एस. एस. पाटील, संजय नेवे, भांडारपाल दीनानाथ भामरे, मनपाचे सर्व विभाग प्रमुख, कर्मचारी वर्ग तसेच मनपा शिक्षक यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.
आज दोन ठिकाणी देशभक्तीपर मैफिल
शनिवार, दि. 10 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 6 वाजता जळगाव महानगरपालिकेच्या वतीने देशभक्तीपर गीत गायनाच्या संगीत मैफिलीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यात नवीन बस स्टॅन्ड येथील महात्मा गांधी उद्यानात व काव्यरत्नावली चौकातील भाऊंचे उद्यान येथे ही संगीत मैफील होईल. यात देशभक्तीपर गीत गायनामध्ये जळगाव महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी वर्गाने यात सहभाग नोंदविला आहे. या कार्यक्रमास जळगावकरांनी उपस्थित रहावे, असे आवाहन आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी केलले आहे.