भारतीय जनता पार्टीचा ४४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा
वय वर्ष ९४ असलेले नारायणराव चौधरी यांच्या हस्ते ध्वजारोहण
जळगाव दि.६ : जळगाव येथे आज जनसंघ ते भारतीय जनता पार्टी असा प्रवास करत भारतीय जनता पार्टीचा ४४वा वर्धापन दिन भारतीय जनता पार्टी, जनसंपर्क कार्यालय जी.एम.फाउंडेशन व वसंत स्मृती कार्यालय, बळीराम पेठ येथे साजरा करण्यात आला.याप्रसंगी वयोवृद्ध कार्यकर्त्यांच्या हस्ते झालेलं ध्वजारोहण लक्षवेधी ठरलं. ९४ वर्ष वय असलेले नारायणराव चौधरी यांच्या हस्ते ध्वजारोहणकरण्यात आले.कार्यक्रमाचे वयोवृद्ध नारायणराव चौधरी आकर्षण ठरले.
जळगाव येथील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या जी एस ग्राउंड समोरील नूतन जीएम फाउंडेशन भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयाच्या पहिल्या ध्वजारोहणाचा मान भारतीय जनता पार्टीचे ९४वर्ष वय असलेले जेष्ठ कार्यकर्ते नारायण चौधरी राहणार चांगदेव यांना मिळाला काल रात्री त्यांना ध्वजारोहणाचं आमंत्रण मिळाल्यानंतर आज दिनांक ६ रोजी सकाळीच साडेपाच वाजता बसने प्रवास करून ते ध्वज रोहन ठिकाणी वेळेवर पोहोचले आजवरच्या पार्टी च्या खडतर प्रवासाचा त्यांनी अतिशय मोजक्या शब्दात कार्यकर्त्यांसमोर आढावा घेतला तसेच आजच्या परिस्थितीत स्वतःच्या स्वार्थाकरता वेळोवेळी होणारे पक्षांतर याबाबत दुःख व्यक्त करून निष्ठेशी प्रतारणा करणाऱ्या कार्यकर्त्यांना सुचक सल्ला दिला.याप्रसंगी जिल्हाध्यक्ष उज्वला बेंडाळे जळगाव शहराचे आमदार राजू मामा भोळे कार्यक्रमाचे प्रमुख नारायणराव चौधरी यांनी या प्रसंगी मनोगत व्यक्त केले तसेच जनसंघाच्या वेळेपासून कार्य करत असलेले आणि भारतीय जनता पार्टीच्या स्थापनेपासून जेष्ठ कार्यकर्ते नारायणराव चौधरी, उदय भालेराव, मुकुंद मेटकर, भाग्यश्री चौधरी, सुभाष चौधरी, यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी आमदार सुरेश (राजूमामा) भोळे, जिल्हाध्यक्ष उज्वला बेंडाळे, आमदार चंदू पटेल, लोकसभा उमेदवार स्मिता वाघ, लोकसभा प्रमुख डॉ. राधेशाम चौधरी, माजी जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, सरचिटणीस अमित भाटिया अरविंद देशमुख सुनिल खडके प्रकाश बालानी, कैलास सोनवणे, शक्ति महाजन, विरण खडके, प्रल्हाद सोनवणे, प्रभाकर सोनवणे, गोपाल पोपटानी, जितेंद्र मराठे, भारती सोनवणे, सीमा भोळे, सुचिता हाडा, रेखा वर्मा, ज्योती निंभोरे, भैरवी वाघ, दीप्ती चिरमाडे, रेखा कुलकर्णी, रंजना वानखेडे, मीनाक्षी पाटील, छाया सारस्वत, सरोज पाठक, जयश्री पाटील, केतकी पाटील, रेखा पाटील, कांचन सोनवणे, गायत्री राणे, सुरेखा तायडे, प्रदीप रोटे, योगेश पाटील, वंदना पाटील, चित्रा मालपाणी, भगत बालानी, आनंद सपकाळे, जयेश ठाकूर, अमित देशपांडे, मयूर कापसे, महेश पाटील, शोभा कुलकर्णी, अशोक कोष्टी, संजय शिंदे, राहुल घोरपडे, महादू सोनवणे व पदाधिकारी तसेच मंडळ व आघाडी अध्यक्ष , कार्यकर्ते उपस्थित होते.