जळगावसामाजिकसांस्कृतिक

मनपा शाळेतील विद्यार्थ्यांनी लुटला ‘क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम’ चित्रपटाचा आनंद;अर्चना राणे यांचा पुढाकार

अभिनेते सिद्धार्थ चांदेकर, अमेय वाघ यांनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद

| लोकमाध्यम न्युज जळगांव | दि. १० जानेवारी २०२६ :  मराठी भाषेचे महत्त्व आणि मराठी शाळांची सद्यस्थिती मांडणाऱ्या ‘क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम’ या चित्रपटाचा विशेष खेळ आज जळगाव येथील महानगरपालिका केंद्र शाळा क्रमांक २ च्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आला होता. विशेष म्हणजे, यावेळी प्रसिद्ध मराठी अभिनेते सिद्धार्थ चांदेकर, अमेय वाघ यांनी स्वत: थिएटरमध्ये येऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

विद्यार्थ्यांच्या मनात मराठी भाषेबद्दल अभिमान जागृत करण्यासाठी अर्चना राणे यांच्या विशेष सहकार्यामुळे या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. चिमुरड्यांना मोठ्या पडद्यावर चित्रपट पाहण्याची संधी मिळाली व त्यानंतर त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता.

चित्रपट पाहिल्यानंतर विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठा आनंदाचा क्षण ठरला तो म्हणजे चित्रपटातील कलाकारांची भेट. प्रसिद्ध मराठी अभिनेता सिद्धार्थ चांदेकर, अमेय वाघ आणि चित्रपटाच्या दिग्दर्शकांनी प्रत्यक्ष थिएटरमध्ये येऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. “मराठी भाषा जगवा, मराठी शाळा टिकवा” असा मोलाचा संदेश यावेळी कलाकारांनी विद्यार्थ्यांना दिला. आपल्या लाडक्या कलाकारांना प्रत्यक्ष समोर पाहून विद्यार्थी भारावून गेले होते.

खाऊ आणि शीतपेयांची मेजवानी

अनेक विद्यार्थी पहिल्यांदाच वातानुकूलित थिएटरमध्ये चित्रपट पाहण्यासाठी आले होते. यावेळी मुलांसाठी अल्पोपहार आणि शीतपेयांचीही सोय करण्यात आली होती. चित्रपटाचा आनंद घेतानाच खाऊ मिळाल्याने मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद द्विगुणित झाला होता.

मराठी शाळा टिकवण्याचा निर्धार

“मराठी भाषा तर आता अभिजात झाली, पण मराठी शाळा कधी अभिजात होणार?” हा ज्वलंत प्रश्न या निमित्ताने उपस्थित करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या मनात मराठी भाषेबद्दल अभिमान जागृत करणाऱ्या या उपक्रमाबद्दल शाळेच्या वतीने अर्चना राणे यांचे मनापासून आभार मानण्यात आले.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button