सैराट फेम “आर्चि रिंकू राजगुरु” आज जळगावात
जळगाव दि. ३ : महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक विभाग आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने आयोजित ‘ महसंस्कृती महोत्सवात विविध कलांचे सादरीकरण केले जात आहे. आज दि. ३ मार्च रोजी समारोपाला या
महोत्सवाला सैराट फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू हि येत असून कार्यक्रमाला संध्याकाळी ६ वाजता पोलीस कवायत मैदानावर उपस्थित राहणार आहे.या सोबतच ऐतिहासिक नाटक ‘जेंव्हा रायगडाला जाग येते तेंव्हा ‘सादर केले जाणार आहे. तसेच ‘अवधेय-एक आदर्श’ ही नृत्य नाटिकाही होणार आहे.
मी येते आहे तुम्हीही या…
जळगावात आयोजित महासंस्कृती महोत्सवात रविवार दिनांक ३ मार्च रोजी सायंकाळी सहा वाजता पोलीस कवायत मैदानावर मी येत आहे तुम्हीही या असे आवाहन जळगावकरांना सोशल मीडिया द्वारे रिंकू राजगुरुने केले आहे.
याकरिता जळगावकर नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थिती द्यावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे.