श्री गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त सुरभी ग्रुपचे पारायण

| लोकमाध्यम न्युज जळगांव | दि. ६ फेब्रुवारी २०२६ :बांभोरी येथील श्री गजानन महाराज मंदिरात सुरभी पारायण ग्रुपतर्फे श्री गजानन महाराजांच्या पोथीचे पारायण करण्यात आले.
सुरवातीला अध्यक्षा स्वाती कुळकर्णी ह्यांनी संकल्प सांगितला. या नंतर गणपती अथर्वशीर्ष आवर्तन आणि श्री गजानन महाराजांच्या पोथीचे सामूहिक पारायण करण्यात आले. गजानन बावनीं , आरती व प्रसादाने सांगता झाली.
ह भ प श्री यशवंत आण्णा महाराजांच्या हस्ते अध्यक्षा स्वाती कुळकर्णी, ज्योती भोकरडोळे व सौ प्रियंका जोशी ह्यांचा धार्मिक पुस्तक व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात केला.
ह्यावेळी सुरभी च्या सभासद, प्रतिमा काटदरे, सविता नाईक, अंजली धवसे, स्वाती वि कुळकर्णी, स्वाती टेनी, पुष्पाताई पाटील, ह्यांचे सहकार्य लाभले. असावारी जोशी आशा बिडकर, उषा पाठक, चारुलता जोशी, शुभदा राव, प्रिती नाईक, ललिता टिपरे, अश्विनी जोशी, नीला महाशब्दे, सोनाली करमरकर, शुभदा राव उपस्थित होत्या.





