
| लोकमाध्यम न्यूज जळगांव दि. १४ : भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंती निमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने सकाळी ८: वाजता जळगाव रेल्वे स्टेशन जवळील डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन व मानवंदना देण्यात आली. कविवर्य वामन दादा कर्डक यांचे “उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे” हे गीत सर्वांनी मिळून गायले.
या प्रसंगी अभिवादन करण्यासाठी रा. स्व. संघाचे प्रांत सहकार्यवाह स्वानंद झारे, विभाग कार्यवाह स्वप्निल चौधरी, विभाग प्रचारक विकास देशपांडे, शहर कार्यवाह विजय ठाकरे, धर्मजागर गतिविधिचे भाईजी मुंदडा, समरसता मंच चे विजय मोघे व शहरातील अनेक स्वयंसेवक उपस्थित होते.