जळगांव जिल्हानिधन वार्ता
ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष अरविंद लाठी यांचे निधन सकाळी अंत्ययात्रा

| लोकमाध्यम न्युज | जळगाव (प्रतिनिधी) दि. १९ : जळगाव येथील ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष अरविंद बंकटलाल लाठी (वय ७८) यांचे आज रविवार दिनांक १९ जुलै रोजी दुपारी १२:५० वाजता हृदय विकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. अनिल, दिलीप आणि अविनाश यांचे थोरले बंधू आणि आनंद व अभिषेक यांचे मोठे वडील होत. ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्था ( आर. आर. विद्यालय, न्यू इंग्लिश मेडियम स्कुल ) चे अध्यक्ष होते. त्याची अंत्ययात्रा सोमवार दिनांक २० जुलै २०२६ रोजी सकाळी ९:३० वाजता त्यांचे निवासस्थान लाठीज २५, प्रभात कॉलनी, जळगाव येथून निघून नेरिनाका वैकुंठधाम येथे अंत्यसंस्कार होतील.







