जळगाव दि. २० : भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे राज्यात प्रतिबंधीत असलेले 73 लाखांचे मेथाक्वॉलोन ड्रग्ज एका हॉटेलमधून जप्त करीत तीन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईने ड्रग्ज पेडलरांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. गेल्या काही महन्यिांपासून भुसावळसह परिसरात या ड्रग्जची विक्री सुरू होती मात्र पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी सापळा रचून आरोपींना अटक केली.
जिल्हा पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांची पत्रकार परिषदेत माहिती
याप्रकरणी कुणाल भरत तिवारी वय 30, प्लॉट नंबर 24, तापी नगर, भुसावळ), जोसेफ जॉन वालाड्यारेस वय 28, रामायण नगर, कंटेनर यार्ड, वरणगाव रोड, भुसावळ), दीपेश मुकेश मालवीय वय 31, लाल जैन मंदिरामागे, भुसावळ) या आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडूा 73 लाखाचे ९१० ग्रॅम मेथा क्वालोन ड्रग्ज आणि दोन मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.
यांनी केली कारवाई _
ही कारवाई जळगाव पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे, बाजारपेठ पोलीस निरीक्षक गजानन पडघन, पोलीस उपनिरीक्षक मंगेश जाधव, पोहे कॉ प्रशांत सोनार,प्रशांत परदेशी,विजय नेरकर,महेश चौधरी,यासीन पिंजारी,भूषण चौधरी,अमर आढाळे आदींच्या पथकाने केली.