जळगांव दि. ८ : जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात जळगावच्या अखिल भारतीय तेरापंथ महिला मंडळा तर्फे श्री एच. बी. संघवी हायस्कूल खेडगाव नंदीचे येथील शिक्षिका श्रीमती शितल संजय जडे यांना त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्यातील कामगिरीमुळे अखिल भारतीय तेरापंथ महिला मंडळाच्या वतीने पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
मंडळांच्या अध्यक्षा श्रीमती निर्मला छाजेड यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे जितो लेडीज विंग च्या संचालिका नीता जैन यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
शितल जडे यांची शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थी हित लक्षात घेत कोरोना काळात इंग्रजी व्याकरण व इंग्रजी कवितांचा संग्रह असलेले शालेय पुस्तके प्रकाशित झाली आहेत. शितल जडे यांनी शेतकरी संघटनेत सुद्धा मोलाचे कार्य केले आहे. तसेच त्यांची साई समीक्षा प्रतिष्ठान नावाच्या सामाजिक संस्थेत त्यांनी अनेक लोकहित कार्य पार पाडली आहेत.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमती निर्मला छाजेड ह्या होत्या. सुत्र संचालन खुशबू बाफना व हिमांशी सेठीया यांनी केले. आभार प्रदर्शन निर्मला छाजेड यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी रिटा बेद, खुशबू बाफना , हिमांशी सेठीया यांनी परिश्रम घेतले.