जळगावक्राईम

भाजप पदाधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला, रात्री घरात घुसून बेदम मारहाण

आरोपींना लवकरात लवकर अटक करावी, आम्हाला संरक्षण द्यावे : तक्रारदार गोपाल पोपटानी यांची मागणी

| लोकमाध्यम News | :जळगाव शहरातील भाजप महानगर सचिव गोपाल टिकमदास पोपटानी यांनी एक भांडणात मध्यस्थी केल्याने रविवारी रात्री १० वाजेच्या सुमारास पोपटानी यांच्यावर २०-२५ जणांच्या टोळक्याने घरात घुसून प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. दरम्यान, याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना लवकरात लवकर अटक करावी आणि आम्हाला संरक्षण मिळावे अशी मागणी गोपाल पोपटानी यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. 

पत्रकार परिषदेत बोलताना भाजप महानगर सचिव तथा माजी मंडळ अध्यक्ष गोपाल पोपटानी सांगितले की, गल्ली ते दिल्ली भाजपची सरकार असताना देखील आमच्यासारख्या भाजप पदाधिकाऱ्यावर हल्ला होत असल्याने बंगाल सारखी परिस्थिती निर्माण झाली आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे मी याबाबत तक्रार करणार असून आम्हाला न्याय देण्याची मागणी करणार आहे.धमकीनंतर अदखलपात्र गुन्हा आणि हल्ला

हल्ला करणाऱ्या टोळक्यातील काही लोकांनी अगोदर फोनवरून जीवे मारण्याची धमकी दिली होती याबाबत देखील पोलिसात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी वेळीच कारवाई केली असती तर टोळक्याची हिंमत वाढली नसती. पोलिसांकडून त्वरित कठोर कारवाई न झाल्याने हल्लेखोरांनी घरात घुसून मारहाण केली असल्याची माहिती देखील गोपाल पोपटानी यांनी दिली आहे.

अशी आहे गुन्ह्याची माहिती

गोपाल पोपटानी यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, सिंधी कॉलनी जळगाव येथे राहणारे त्यांचे मोठे भाऊ किशोरदास टिकमदास पोपटानी यांच्या राहत्या घरी दि.१ नोव्हेंबर रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास मी तसेच माझे मोठे भाऊ किशोरदास टिकमदास पोपटानी, वहिणी रेश्मा पोपटानी आई रेखा पोपटानी, पुतण्या गोविंद पोपटानी असे जेवण करीत असतांना अचानक घरात सिंधी कॉलनी परिसरात राहणारे 1) विशेष हासवानी, 2) विशेष हासवानी यांची पत्नी, 3) रीया राजपाल, 4) कान्हा राजपाल, 5) अमित टोपलानी, 6) विशाल राजपाल, 7) निखील जाधवानी, 8) ओम मंधान, 9) रोहित जाधवानी, 10) आकाश जाधवानी, 11) करण जाधवानी, 12) रौनक जाधवानी, 13) मुन्ना राजपाल, 14) रोहित राजपाल, 15) चेतन राजपाल 16) अंजु शंकर राजपाल सोबत 4 ते 5 अनोळखी इसम असे घरात घुसुन मागील दोन दिवसा पुर्वी विशेष हासवानी व माझा पुतण्या गोविंद पोपटानी यांच्या भांडणात मध्यस्ती केली होती या कारणावरुन अनाधीकारे घरात घुसुन मी तसेच भाऊ, पुतण्या व वहीणी अशांना संगनमत कुन गैरकायद्याची मंडळी जमवुन शिवीगाळ करत चापटा बुक्यांनी तसेच जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या व आरोपी 05, कान्हा राजपाल याने त्याच्या हातातील फायटरने माझे उजव्या डोळ्याखाली मारुन दुखापत केली तसेच आरोपी क्र. 01, विशेष आसवानी याने त्याच्या हातातील बँटने माझे हाता, पायवर तसेच पाठीवर बँटने मारुन मारहाण केली. सदर भांडणात माझ्या गळ्यातील सोन्याची चैन तुटुन कोठेतरी पडुन गहाळ झाली असुन नुकसान झाले आहे म्हणुन माझी वरील आरोपी क्र. 1 ते 16 व सोबत 4 ते 5 अनोळखी इसम सर्व रा. सिंधी कॉलनी जळगांव यांच्या विरुध्द कायदेशीर र्फियाद आहे.

पोलीस अधिक्षकांना दिले निवेदन

दरम्यान, गोपाल पोपटानी यांनी यांनी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना देखील आज निवेदन दिले आहे. पूर्वनियोजित कट रचून घरात घुसून २० ते २५ जणांच्या जमावाने हत्यार व क्रिकेटच्या बॅटने जीवघेणा हल्ला करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याबाबत, हल्ल्यापूर्वी फोनवरून जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याबाबत, गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींना सोडून दिल्याच्या प्रक्रियेची वरिष्ठ स्तरावर चौकशी करून आरोपींविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करणे, निष्पक्ष तपास करणे व अर्जदारासह कुटुंबीयांना पोलीस संरक्षण देण्याबाबत त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button