लोकमाध्यम न्युज | जळगांव ४ जानेवारी २०२५ |
भारतीय जनता पार्टी सदस्य अभियानाची संपूर्ण देशात व महाराष्ट्रात सुरुवात झाली असून प्रदेशाध्यक्ष ना. चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाराष्ट्रातून एक कोटी सदस्य अभियानाचा संकल्प केला असून याच अनुषंगाने जळगांव शहरांतून सुद्धा लाखाच्यावर सदस्य नोंदणी अभियान राबविण्याचा संकल्प जिल्हा महानगराध्यक्ष उज्वलाताई बेंडाळे यांनी केला आहे.
दिनांक ५ जानेवारी रोजी रोजी भाजपा जिल्हा महानगराच्या ९ मंडलात खालीलप्रमाणे
मंडल क्र १ छत्रपती शिवाजी महानगर, मंडल क्र२ महर्षी वाल्मिक नगर, मंडल क्र ३अयोध्यानगर, मंडल क्र ४ रिंग रोड परिसर, मंडल क्र ५ पिंप्राळा परिसर, मंडल क्र ६ रामानंद नगर परिसर, मंडल क्र ७ झुलेलाल परिसर, मंडल क्र ८ मेहरूण परिसर, मंडल क्र ९ महाबळ परिसर या एकूण ९ मंडलांमधील प्रत्येक बूथमध्ये भाजपा महासदस्य अभियान राबविण्यात येणार आहे.
या सदस्य अभियानाची सुरुवात जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन, केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षाताई खडसे, ना संजय सावकारे,खा श्रीमती स्मिताताई वाघ, आ सुरेश भोळे (राजूमामा), जिल्हा महानगर अध्यक्षा सौ उज्वलाताई बेंडाळे उत्तर महाराष्ट्र सदस्य नोंदणी आ.मंगेश चव्हाण हे या अभियानाचे प्रभारी असून अभियान संयोजक डॉ. राध्येश्याम चौधरी, जिल्हा संयोजक महेश जोशी व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत संपूर्ण जळगाव शहरात सदस्य अभियान प्रत्येक बूथमध्ये राबवण्यात येणार आहे. तरी यासाठी सर्व नागरिकांनी ज्यांना भाजपा सदस्य होण्यासाठी ८८००००२०२४ या टोल फ्री नंबरवर मिस कॉल देऊन आपण सुद्धा जगातील एक नंबर असलेल्या पक्षाचे सदस्य व्हावे, असे आवाहन जिल्हा महानगर अध्यक्षा उज्वलाताई बेंडाळे यांनी केलेले आहे.असे मनोज भांडारकर भाजप जिल्हा प्रसिद्धी माध्यम समन्वयक यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.