लोकमाध्यम न्युज | जळगाव १० सप्टेंबर २०२४ |
जळगाव शहरातील आकाशवाणी चौकातील बाबा टावर्स मध्ये असलेल्या आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेडतर्फे (आकाश क्लासेस) राष्ट्रीय पातळीवरील अँथे शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येत असून, यामधून
वैद्यकीय-अभियांत्रिकीत करिअर करू इच्छिणाऱ्या मुलांना मदतीचा हात दिला जाणार आहे अशी माहिती आकाश क्लासेसचे शाखा व्यवस्थापक पुंडरिक भारद्वाज यांनी मंगळवार दि.१० रोजी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
पत्रकार परिषदेत पुढे बोलताना भारद्वाज म्हणाले की, सातवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना यात सहभागी होता येईल. पाच विद्यार्थ्यांना अमेरिकेतील केनेडी स्पेस सेंटरमध्ये मोफत सहल, १५० सर्वोत्कृष्ट ५० विद्यार्थ्यांना रोख पुरस्कार आणि अन्य लाभ दिले जाणार आहेत.१९ ते २७ ऑक्टोबर दरम्यान ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने परीक्षा होणार आहे. शंभर टक्क्यांपर्यंत शिष्यवृत्ती उपलब्ध असणार आहे.गतवर्ष देशभरातून ११.८ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. नोंदणी विद्यार्थी किंवा पालकाना anthe.aakash.ac.in या ऑनलाइन किंवा आकाशच्या केंद्रात अर्ज करता येईल. आकाश कडून१५ वर्षांपासून ही परीक्षा घेतली जात आहे. ही शिष्यवृत्ती मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना आकाशच्या विस्तृत कोचिंग प्रोग्रामचा फायदा झाला होतो.
याद्वारे विद्यार्थ्यांना नीट, जेईई, राज्य सीईटी सह एनटीएसई,ऑलिम्पियाड सारख्या विविध परीक्षांसाठी मार्गदर्शन केले जाते.परिणामी असंख्य विद्यार्थ्यांच्या आकांक्षा आणि क्षमतां मधील अंतर भरुन काढण्यात अँथे महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. डॉक्टर, अभियंते घडवण्यासाठी आणि डॉ. अब्दुल कलाम, स्वामीनाथन आदींसारख्या प्रतिभांचा शोध घेण्यासाठीही परीक्षा असून, त्यातून आपली तरुणाई विज्ञान, तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात अग्रगण्य कार्य करत भारताचा जगात गौरव करतील, अशी अपेक्षा आकाश क्लासेसची आहे. तसेच भारतातील २६ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ही परीक्षा होणार आहे. उत्कृष्ट विद्यार्थ्यांना १०० टक्क्यांपर्यंतच्या शिष्यवृत्ती व्यतिरिक्त रोख पुरस्कार देखील मिळतील असे मत भारद्वाज यांनी बोलताना सांगितले.पत्रकार परिषदेला प्रीतम कुमार,राहुल कुमार ,अमित प्रताप सिंग आदींची उपस्थिती होती.
९० गुणांची परीक्षा
आकाश संस्थेच्या देशभरातील ३९५ हून अधिक केंद्रांवर २० आणि २७ ऑक्टोबर रोजी सकाळी१०.३० ते ११.३० या वेळेत ऑफलाइ नतर ऑनलाइन परीक्षा १९ ते २७ ऑक्टोबर२०२४ ऑनलाईन परीक्षा होणार आहे. ही एक तासाची चाचणी असेल. ज्यामध्ये एकूण ९० गुण असतील. विद्यार्थ्यांच्या ग्रेड,कलवर आधारित ४० एमसीक्यू पद्धतीचे प्रश्न असतील. परीक्षेसाठी नावनोंदणी करण्याची अंतिम तारीख ऑनलाइन परीक्षा सुरू होण्याच्या तीन दिवस आधी आणि ऑफलाइन परीक्षेच्या सात दिवस आधी आहे. ऑफलाइन आणि ऑनलाइन परीक्षेसाठी २०० रुपये परीक्षा शुल्क आहे.१५ ऑगस्ट पूव नोंदणी केल्यास नोंदणी शुल्कात ५० टक्के सवलत मिळेल.