जळगावमहापालिका

महापौर स्वच्छता संकल्प अभियान : दीपमाला काळे यांची वॉर्ड क्रमांक १५ मध्ये पाहणी; विहीर स्वच्छ करून पाणी वापरासह स्वच्छतेच्या समस्यांचे त्वरित निवारणाचे आदेश

| लोकमाध्यम News | जळगाव: जळगाव शहर महानगरपालिकेच्या महापौर दीपमाला काळे यांनी ‘महापौर स्वच्छता संकल्प अभियान’ अंतर्गत मंगळवारी (दि. ३ नोव्हेंबर) वॉर्ड क्रमांक १५ ला भेट देऊन विविध विकासकामांची व परिसराची पाहणी केली. 

या वेळी स्थानिक नगरसेवक प्रकाश बालाणी, अरविंद देशमुख, रेश्मा काळे, कलाबाई शिरसाळे यांच्यासह आरोग्य विभागाचे प्रमुख समीर बोरोले, बांधकाम विभागाचे अभियंता महेश सुर्वे, तसेच पाणीपुरवठा व विद्युत विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

गटार व स्वच्छता समस्या

दौऱ्याची सुरुवात लाठी शाळेजवळून झाली. या वेळी महापौरांनी परिसराची पाहणी करून तेथील गटारींच्या समस्या तातडीने सोडवण्याचे निर्देश दिले. तसेच सिंधी कॉलनी ते पंचमुखी हनुमान मंदिर दरम्यान निर्माण झालेले कचरा स्पॉट बंद करण्यास सांगितले. रचना कॉलनी जवळील कचरा स्पॉट्सवरून कचरा उचलण्यासाठी बिव्हिजीच्या कर्मचाऱ्यांना त्वरित वाहन देण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.

अतिक्रमण कारवाईचे आदेश

लाठी शाळेजवळ खुल्या जागेत एका महिलेने केलेल्या अतिक्रमणाबाबत कागदपत्रे तपासून कारवाई करण्याचे, अन्यथा अतिक्रमण काढून टाकण्याचे सक्त आदेश महापौरांनी दिले.शनिवार बाजार व वाहतूक नियोजन

शनिवार बाजार परिसराची पाहणी करताना, विक्रेत्यांना पक्क्या रेषा (लायनिंग) आखून देऊन त्यानुसारच त्यांना बसवण्याचे निर्देश दिले. रस्त्यावर वाहने येणार नाहीत आणि वाहतुकीला अडथळा होणार नाही अशा प्रकारे योग्य नियोजन करण्याबाबत बांधकाम व अतिक्रमण विभागाला सांगण्यात आले. तसेच, अस्वच्छता पसरवणाऱ्या मच्छी विक्रेत्यांना दंड आकारण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

बालवाडी परिसरातील विहिरीचा वापर

रचना कॉलनीतील बालवाडीची पाहणी केल्यानंतर, सदर बालवाडीच्या परिसरातील मोठी विहीर स्वच्छ करून तिचे पाणी जळगावकरांच्या वापरासाठी उपलब्ध करून देता येईल का, याबाबत तातडीने नियोजन करण्याचे निर्देश पाणीपुरवठा विभागाला देण्यात आले.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button